बाबासाहेबांच्या बैलगाडीचे आकर्षण

By Admin | Updated: April 15, 2015 00:42 IST2015-04-15T00:33:18+5:302015-04-15T00:42:24+5:30

लातूर : डॉ़बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे आले होते तेव्हा तेथील ग्रामस्थांनी बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती़

The charm of Babasaheb bullock cart | बाबासाहेबांच्या बैलगाडीचे आकर्षण

बाबासाहेबांच्या बैलगाडीचे आकर्षण


लातूर : डॉ़बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे आले होते तेव्हा तेथील ग्रामस्थांनी बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती़ बाबासाहेबांची मिरवणूक ज्या बैलगाडीतून काढण्यात आली होती, ती बैलगाडी १४ एप्रिल रोजी लातूरच्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत आली असता, नागरिकांनी मोठ्या उत्साहात बैलगाडीची मिरवणूक काढली़
बाबासाहेबांच्या या बैलगाडीचे आकर्षण लातुरातील अबालवृद्धांना होते़ जुन्या पिढीतील नागरिकांनी बाबासाहेबांच्या कसबे तडवळे येथील भेटीच्या आठवणींना उजाळा दिला़ लातूरमध्ये ही बैलगाडी आणण्यासाठी अनेक दिवसांपासून कार्यकर्ते प्रयत्न करीत होते़ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अखेर त्यांचा प्रयत्न सफल केला़ यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.

Web Title: The charm of Babasaheb bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.