'वीकेंड'ला प्रवासाचे नियोजन बदला! शिवाजीनगर भुयारी मार्ग दोन दिवसांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:20 IST2025-11-08T18:18:56+5:302025-11-08T18:20:06+5:30
भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'वीकेंड'ला प्रवासाचे नियोजन बदला! शिवाजीनगर भुयारी मार्ग दोन दिवसांसाठी बंद
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, ८ व ९ नोव्हेंबर रोजी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवार आणि रविवारी शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर पर्यायी मार्गाने वळविण्याची विनंती वाहतूक पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक दोन दिवसांसाठी बंद केली आहे.
त्यामुळे सर्व प्रकारची वाहने देवळाई चाैक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून जातील व येतील. देवळाई चौक ते गोदावरी टी, एमआयटी, महानुभव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन मार्गे जातील व येतील. देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर मार्गाने शहानूरमिया दर्गा चौकाकडे जातील व येतील, शिवाजीनगर, सुतगिरणी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून जातील व येतील, शिवाजीनगर चौक, धरतीधन सोसायटी, गादीया विहार मार्गे शहानूरमिया दर्गा चौक मार्गे येतील व जातील असे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे. या बंद मार्गावरील नियम पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू असणार नाही, असेही देवकर यांनी स्पष्ट केले.