शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांसमोर समस्यांचे आव्हान

By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST

परभणी : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी नूतन पदाधिकारी विराजमान झाले असून, या पदाधिकाऱ्यांसमोर शहरातील समस्यांचा डोंगर उभा आहे़

परभणी : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी नूतन पदाधिकारी विराजमान झाले असून, या पदाधिकाऱ्यांसमोर शहरातील समस्यांचा डोंगर उभा आहे़ यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांना शहर विकासाकडे नेण्यासाठी आव्हानात्मक काम करावे लागणार आहे़ परभणी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर संगीता वडकर ह्या मनपाच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत़ तर उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे विराजमान झाले आहेत़ महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ नगरपालिका असताना परभणीकरांचे जे प्रश्न होते ते आजही कायम आहेत़ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे़ तीस वर्षांच्या जुन्या योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो तो अपुरा ठरत आहे़ त्यामुळे नवी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम बरेचसे पूर्ण झाले असून, दुसरा टप्पा मात्र रखडला आहे़ या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे आणि जलकुंभांची जागा निश्चित करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे़ शहरवासियांच्या पाणी प्रश्नाला मनपाने गांभिर्याने घेऊन नवीन योजना तातडीने राबविल्यास नागरिकांची पाण्याची मोठी समस्या कमी होणार आहे़ पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इतर अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत़ शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे़ त्या तुलनेमध्ये नव्याने मालमत्तांची मोजणी झालेली नाही़ त्यामुळे मनपाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे़ महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवून हा पैसा विकास कामांसाठी वापरता येऊ शकतो़ त्यामुळे मालमत्ता मोजणीच्या कामालाही या पदाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे़ शहर स्वच्छतेची समस्या देखील आहे़ शहरामध्ये नियमित स्वच्छता होत नाही़ कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़ स्वच्छतेचे नियोजन केले जात नाही़ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो़ शहरात अनेक समस्या असल्या तरी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मुलभूत गरजा सोडविण्याचे आव्हान नुतन महापौर आणि उपमहापौरांसमोर आहे़ (प्रतिनिधी)