धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्यास बेड्या; ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान कारवाई
By राम शिनगारे | Updated: May 11, 2023 19:52 IST2023-05-11T19:51:52+5:302023-05-11T19:52:46+5:30
बायजीपुरा भागात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई

धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्यास बेड्या; ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान कारवाई
छत्रपती संभाजीनगर : बायजीपुरा भागात एकजण धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून धरदार तलवार घेऊन फिरणाऱ्यास बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
मोहम्मद शाहरूख शेख मोहम्मद नाईम शेख (२७, रा. बायजीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. जिन्सी ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांना शाहरुख शेख हा बुधवारी दुपारी साडेतीन वाजता बायजीपुरा भागात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यास पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३१ इंच लांबीची एक तलवार व तलवारीचे काळ्या रंगाची चांबडी कव्हर जप्त करण्यात आले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गर्शनात उपनिरीक्षक तांगडे, जमादार शेख जफर, शंतोष शंकपाळ, संतोष बमनथ, सुरे यांनी केली.