छ. संभाजीनगर गारखेडा तणाव: सहा दंगेखोरांना अटक, हद्दपार आरोपीचाही तोडफोडीत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:00 IST2026-03-06T12:08:35+5:302026-03-06T13:00:02+5:30

हद्दपार असताना आरोपीचा शहरात गुंडगिरीत सहभाग. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

Ch. Sambhajinagar Garkheda tension: Six rioters arrested, deported accused also involved in vandalism | छ. संभाजीनगर गारखेडा तणाव: सहा दंगेखोरांना अटक, हद्दपार आरोपीचाही तोडफोडीत सहभाग

छ. संभाजीनगर गारखेडा तणाव: सहा दंगेखोरांना अटक, हद्दपार आरोपीचाही तोडफोडीत सहभाग

छत्रपती संभाजीनगर : धुळवडीदरम्यान गारखेड्याच्या इंदिरानगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी होत मोठा तणाव निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान रात्री दगडफेकीत झाल्याने दोन दिवस तणाव निर्माण झाला. यात दाखल तीन गुन्ह्यातील प्रमुख संशयित एकूण सात जणांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेत सहाजणांना अटक केली. तर सातवा आरोपी अल्पवयीन आहे. या अटकेतील सहा आरोपींना न्यायालयाने गुरुवार, दि. ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चारचाकीचालक असलेला अगबान खालेद चाऊस, डिलिव्हरी बॉयचे काम करणारा रियान हुसेन शेख, मजुरी करणारा सोहेल ऊर्फ सुलतान सलीम, गुलाबखान वजीरखान, रिक्षाचालक अमीर खान अय्युब खान व सलीम रुस्तुम खान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील रेहान हुसेन शेख, सोहेल युनूस पठाण, जावेद, नवाब, सत्तार, अजहर, इरफान सांडू शेख, नवाबची मुले शाहेद आणि जाहेद नवाब, हे पसार असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. तेव्हा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी संशयितांना सात मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा करतेय काय ?
अटकेतील अमीर खान अय्युब खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वागणुकीत बदल न झाल्याने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याचे परिसरात वास्तव्य होते. शिवाय, हद्दपार असताना शहरात सक्रिय गुंडगिरीत सक्रिय होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, गुरुवारीदेखील इंदिरानगरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. गरजेनुसार दंगा काबू पथक तैनात करण्यात आला असून, सातत्याने गस्त सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title : छत्रपति संभाजीनगर झड़प: छह गिरफ्तार, निर्वासन में शामिल तोड़फोड़

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के गरखेड़ा में होली के दौरान झड़प के बाद छह गिरफ्तार। तोड़फोड़ में एक निर्वासन शामिल था। पुलिस अन्य संदिग्धों की तलाश कर रही है। अदालत ने गिरफ्तार आरोपियों को 7 मार्च तक पुलिस हिरासत में भेज दिया।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar Clash: Six Arrested, Deportee Involved in Vandalism

Web Summary : Six arrested after a clash in Chhatrapati Sambhajinagar's Garkheda during Holi. A deportee was involved in the vandalism. Police are searching for other suspects. The court remanded the arrested to police custody until March 7.