शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यावर आमदार निधी...

By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST

हणमंत गायकवाड , लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

हणमंत गायकवाड , लातूरविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आपल्या विकास निधीतील कामांच्या उद्घाटनाचा सपाटाच लावला आहे. यापूर्वीचा निधी बहुतांश आमदारांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामावर वापरल्याचे दिसत आहे. गावातील व शहरांतील रस्त्यांवर आमदार निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्याचबरोबर समाज मंदिर, व्यायामशाळा, स्मशानभूमी, नाल्यांच्या बांधकामावरही हा निधी खर्च झाल्याचा दिसतो आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ४ कोटी ९१ लाख ८ हजार रुपयांचा तर लातूर ग्रामीणमध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर खर्च झाला आहे.लातूर शहर विधानसभा, लातूर ग्रामीण, उदगीर, निलंगा या चार विधानसभा मतदारसंघांत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर चांगला खर्च झाला आहे. सिमेंट व डांबरीकरणाच्या रस्त्याखालोखाल समाज मंदिर, व्यायामशाळा, सभागृह, चावडी बांधकाम, मिनी हायमास्ट बसविणे, स्मशानभूमीची संरक्षण भिंत आदी कामांसाठीही आमदार निधी वापरण्यात आला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा राज्यमंत्री अमित देशमुख यांचा सर्वाधिक निधी सिमेंट रस्त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. २००९-१० मध्ये २१ लाख रुपये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर २०१०-११ मध्ये १ कोटी २४ लाख, २०११-१२ मध्ये १ कोटी ८ हजार, २०१२-१३ मध्ये १ कोटी ३३ लाख आणि २०१३-१४ मध्ये १ कोटी १३ लाख असा एकूण ४ कोटी ९१ लाख रुपये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी खर्च करण्यात आले आहेत.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार वैजनाथ शिंदे यांनीही सिमेंट काँक्रिट रस्ते व डांबरीकरण रस्त्यावर आमदार निधी खर्च केला आहे. २००९-१० मध्ये १३ लाख, २०१०-११ मध्ये १ कोटी १६ लाख, २०११-१२ मध्ये ८८ लाख, २०१२-१३ मध्ये ५६ लाख ७६ हजार आणि २०१३-१४ मध्ये १ कोटी १ लाख ५१ हजार रुपयांचा निधी रस्ते कामावर खर्च केला आहे. उर्वरित निधी सार्वजनिक सभागृह, चावडी बांधकाम, दलित वस्तीतील रस्ते, स्मशानभूमीची दुरुस्ती, महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल अजिंक्य स्पर्धा आदी कामांसाठी वापरण्यात आला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री आ. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही बराचसा निधी सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्याच्या कामावर खर्च केला आहे. त्याच प्रमाणात सामाजिक सभागृहाचेही बांधकाम आमदार निधीतून केले आहे. दलित वस्तीस जोडणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघात २००९-१० मध्ये १९.७२, २०१०-११ मध्ये ६२.२८, २०११-१२ मध्ये ८६.६४, २०१२-१३ मध्ये ८९.७५, २०१३-१४ मध्ये ६७.०६ लाख रुपयांचा खर्च रस्ते कामासाठी करण्यात आला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील आमदार बसवराज पाटील यांनी सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्याच्या कामासाठी २००९-१० मध्ये १८.७९, २०१०-११ मध्ये १६.८२, २०११-१२ मध्ये ६०.४२, २०१२-१३ मध्ये ३९.१३ आणि २०१३-१४ मध्ये २५.८९ लाख रुपये आमदार निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर टँकरने पाणीपुरवठा, विंधन विहिरी घेणे, विहिरीवर विद्युतपंप बसविणे, सामाजिक सभागृह, विंधन विहीरी खोदणे यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे.उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर भालेराव यांनीही रस्ते विकासासाठी आमदार निधी खर्च केला आहे. २००९-१० मध्ये २३.२४ लाख, २०१०-११ मध्ये ७७.२७ लाख, २०११-१२ मध्ये ८४ लाख, २०१२-१३ मध्ये १ कोटी ३० लाख ३३ हजार, २०१३-१४ मध्ये १ कोटी ५३ लाख ५६ हजार, सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी त्यांनी निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर दलित वस्ती सुधारणा, सार्वजनिक चावडी बांधकाम, स्मशानभूमी, सामाजिक सभागृहास संरक्षण भिंत आदी कामांसाठीही निधी खर्च करण्यात आला आहे. प्राधान्याने रस्ते कामासाठी बहुतांश जणांचा निधी खर्च झाला आहे.अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्ते कामाबरोबरच सामाजिक सभागृह, विंधन विहिरी, इलेक्ट्रीकल मोटार बसविणे, पाण्याची टाकी, विंधन विहिरी खोदणे, चावडी बांधकाम, स्मशानभूमीस संरक्षण भिंत आदी कामांवर खर्च केला आहे. २००९-१० मध्ये २८.४९ लाख, २०१०-११ मध्ये एकूण २ कोटी १२ लाख ४९ हजार, २०११-१२ मध्ये १ कोटी ७९ लाख ७४ हजार, २०१२-१३ मध्ये २ कोटी १२ लाख १९ हजार, २०१३-१४ मध्ये १ कोटी ५९ लाख २६ हजार रुपयांचा आमदार निधी मिळाला. या निधीतून १ कोटी रुपये रस्ते कामासाठी खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित निधी प्रयोगशाळा साहित्य, सभागृह बांधकाम, विंधन विहिरी, स्मशानभूमीच्या कामावर खर्च करण्यात आला आहे.आमदारांनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम नियोजन विभागाचे आहे. पूर्वीचा आणि आताचा त्यांचा निधी किती खर्च झाला, ही माहिती कामानुसार संबंधित विभागाकडे असते. निधी नियोजन विभागाकडूनच तिकडे वर्ग होतो. मागील चार वर्षांतील सुचविलेली सर्व कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. रेड्डी यांनी सांगितले.