शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळजोडणीचे प्रकरण हायकोर्टात

By admin | Updated: July 17, 2017 00:34 IST

हिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता. पालिकेतर्फे दंड भरण्यासंदर्भात अनेकदा नोटीसाही बजावल्या तरीही कोणीही दंड भरला नाही. आता हे प्रकरण हायकोर्टात गेल्याने दोषीवर कारवाई होणार हे मात्र निश्चित. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीची १२ एप्रिल रोजी पालिकेने बारकाईने पाहणी केली असता मुख्य वाहिनीवर १५ अवैध नळ जोडण्या आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत हा अनधिकृत नळ जोडणीचा तारांकित प्रश्न मांडला होता. त्यामुळे पालिका जोमाने कामाला लागली होती. मुख्य वाहिनीवर संतुक पिंप्री शिवारात तीन अनधिकृत नळ जोडण्या, तर बापूजी ढाबा येथे दोन नळ जोडण्या, हॉस्टेल साई छाया, साई हॉटेल भोजनालय, श्री गणेश बॉईज हॉस्टेल, मे. खुराणा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्ट्री, नंदा गणेशलाल बियाणी, कमल बाबल्या चव्हाण, माऊली टी हाऊस, तंदुरी नाईट हॉटेल, वैभव बार १, वैभव बार २, हॉटेल साई गार्डन अ‍ॅड रेस्टॉरेंट अशा एकूण पंधरा ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या दिसून आल्या होत्या. या प्रत्येक नळ जोडणीला पालिकेतर्फे १५ लाख ४० हजार ४०२ रुपये दंड आकारला होता. या दंडाची रक्कम २ कोटी ४० लाख ७३ हजार ६३२ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हा दंड विहित मुदतीत पालिकेत भरला नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून जागेला सील केले जाणार होते. परंतु चार महिने उलटूनही दंड भरलेला नाही. आता तर हे प्रकरणच हायकोर्टात गेल्याने दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.