खुलताबादजवळ कार झाडाला धडकून तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:11 IST2019-07-15T12:08:18+5:302019-07-15T12:11:12+5:30

कारमधील इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत

a car hits a tree near Khulatabad;young boy killed on the spot | खुलताबादजवळ कार झाडाला धडकून तरुण जागीच ठार

खुलताबादजवळ कार झाडाला धडकून तरुण जागीच ठार

ठळक मुद्देकारमधील सर्व कन्नडचे रहिवासी सर्वजण कामानिमित्त परभणीला गेले होते

खुलताबाद ( औरंगाबाद ) :  परभणीवरून कन्नडकडे जाणारी एक कार पहाटे ४ वाजेच्या दरम्यान खुलताबाद -औरंगाबाद रस्त्यावर हिमरू शोरूम जवळील झाडाला धडकली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड येथील रहिवासी अवेस अकबर रंगरेज (18) , वसीम अकबर रंगरेज, अरबाज अफजल रंगरेज हे खाजगी कामानिमित्त कारने ( एम.एच.20 डी.व्ही. 0886 ) परभणी येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना औरंगाबाद रोडवरील हिमरू शोरूमजवळील झाडाला पहाटे चार वाजता त्यांची कार धडकली. यात चालकाशेजारी बसलेला अवेस अकबर रंगरेज याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोघे सुखरूप आहेत. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मयत अवेस रंगरेज  याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात पाठवून नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

Web Title: a car hits a tree near Khulatabad;young boy killed on the spot