रस्ता ओलांडताना कारने उडविले, कारपेंटर ठार

By राम शिनगारे | Published: November 19, 2023 09:17 PM2023-11-19T21:17:05+5:302023-11-19T21:17:16+5:30

शहानूरमियाँ दर्गा परिसरातील घटना : उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंद

Car blew up while crossing road, Carpenter killed | रस्ता ओलांडताना कारने उडविले, कारपेंटर ठार

रस्ता ओलांडताना कारने उडविले, कारपेंटर ठार

छत्रपती संभाजीनगर : शहानूरमियाँ दर्ग्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या कारपेंटरला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


अब्दुल जावेद अब्दुल हमीद (४९, रा. शहानूरवाडी) असे अपघातातमृत्यू झालेल्या कारपेंटरचे नाव आहे. अब्दुल जावेद हे कामावरून १७ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास पायी चालत रस्ता ओलांडून घरी जात होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेल्या फाॅर्च्युनर गाडीने (एमएच २०-डीजे ७५००) त्यांना जोराची धडक दिली. त्यात अब्दुल गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अब्दुल वाजेद यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी कार चालकाच्या विरोधात मृत्यू कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक विनोद आबुज करीत आहेत.

Web Title: Car blew up while crossing road, Carpenter killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.