पैठणजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:24 AM2020-01-09T11:24:26+5:302020-01-09T11:47:14+5:30

अपघातात कारचा चुराडा झाला असून कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला

Car and truck crash near Paithan; All three were killed on the spot | पैठणजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू 

पैठणजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू 

googlenewsNext

पैठण : औंरगाबाद  रस्त्यावरील ईसारवाडी फाट्याजवळ कंटेनर आणि कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव असलेली दोन्ही वाहने समोरासमोर  धडकली.  या अपघातात ढोरजळगाव ता. शेवगाव जी. अहमदनगर येथील पती-पत्नी व एक वृद्ध महिला तिघे जण जागीच ठार झाले आहेत.

पैठण-औंरगाबाद मुख्य रस्त्यावरील ईसारवाडी फाट्याजवळ मालवाहतूक करणारे कंटेनर ( क्रं जी.जे.०६. ए.झेड. ६८५१ ) व कार ( क्रं महा.१२ सी.के. ३४६८ ) यांची पहाटे ५ वाजेच्या दरम्यान समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कारचालक बाळासाहेब निवृती डाके  ( ४५) अबिंका बाळासाहेब डाके   (४०)  रा.ढोरजळगाव ता.शेवगाव हे पती पत्नी व बाळासाहेब डाके यांची सासू सुमन रघुनाथ नरवडे (६५) रा.वरुडबुद्रुक ता.शेवगाव या जागीच ठार झाल्या. 

 

अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. या अपघाताची माहिती ईसारवाडी येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याला याची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतांना कारमधून बाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
 

Web Title: Car and truck crash near Paithan; All three were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.