शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनवारीमुळे विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: February 2, 2016 00:27 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीही हजेरी लावली आहे़ एकाच शाळेतील अनेक शिक्षक गेल्याचा प्रकार समोर येत आहे. एकट्या कळंब तालुक्यातील ६९८ पैकी ४६७ तर भुम तालुक्यातून ४४६ पैकी २४१ शिक्षक अधिवेशन वारीवर गेले आहेत. तर वाशी तालुक्यातील ३१२ पैकी २२४ शिक्षक शाळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नवी मुंबईतील पटनी मैदानावर त्रैमासिक अधिवेशन भरविण्यात आले आहे़ या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना आॅन ड्युटी रजा मंजूर करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामविकास खात्याचे याबाबत कोणतेही आदेश नसताना अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली शाळेवर गैहजर राहिल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दिसून आला़ विशेषत: कळंब, भूम, वाशी परिसरातील अनेक शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर शाळेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले़ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तर माध्यमिक शाळेतील १० असे १८ शिक्षक सोमवारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव शेळके यांनी पाहणी केल्यानंतर समोर आला़ शेळके यांनी याबाबत तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली़ रायते यांनी या प्रकरणात तक्रार द्या, कारवाई करू, असे सांगितल्याची माहिती शेळके यांनी दिली़ तर सांजा येथील पालक प्रविण वसुदेव सूर्यवंशी, सुरेश संग्राम भोसले या पालकांनीही अनधिकृतपणे शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ दरम्यान, शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.याबाबत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिवेशनाबाबत अगोदर सर्व शाळांबाबत पत्रक काढले होते़ मात्र, दुसरे पत्र खासगी शाळांबाबत काढले असून, शाळा बंद राहणार नाहीत व शिक्षक गैरहजर राहणार नाहीत याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे़ शिक्षक अधिवेशनाला गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ मुख्याध्यापकांनी कामात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिवेशनाला किती शिक्षक गेले याची माहिती मागविण्यात आली आहे़ जे शिक्षक अनधिकृतपणे अधिवेशनाला गेले असतील त्यांची रजा ही त्यांच्या अर्जित रजेत वर्ग करण्यात येणार आहे़ शिवाय त्यांच्या सेवा पुस्तिकेवरही याची नोंद करण्यात येणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले़