शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !

By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला. या निधीला सुरुंग लावण्याचे काम मोठमोठ्या गुत्तेदारांनी केले. सर्वसामान्य व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कामे मिळालीच नाहीत. आता प्रचारासाठी नेत्यांकडून दुसऱ्या फळीतील उमेदवारांना निमंत्रण येत आहे, मात्र कार्यकर्ते म्हणतात की, ‘ज्यांना कामे दिले त्यांनाच बोलवा आता प्रचाराला’ या स्थितीमुळे उमेदवार गोंधळले आहेत.विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आणि प्रचार म्हटलं की, कार्यकर्त्यांची गर्दी आलीच. ही गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांचे बगलबच्चे मोठा आटापिटा करीत आहेत. गावच्या सरपंचापासून ते पं.स. सदस्य, जि.प. सदस्य इथपर्यंत सगळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जमविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक सूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मुंबई, पुण्यावरुन गुत्तेदार आयात केले असल्याने छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना साधा गावातील रस्ताही मागच्या पाच वर्षांत मिळाला नाही. कोट्यवधीच्या निधीला बाहेरच्या गुत्तेदारांनी सुरुंग लावला. अशी स्थिती जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात कमी, जास्त प्रमाणात पहावयास मिळते. सध्या प्रचार सुरू झाला असल्याने ज्या गावांमधील ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात आहे. त्यांना प्रचारासाठी बोलावले जात आहे. मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये संबंधित उमेदवाराविषयी रोष असल्याचे पहावयास मिळते. काही कार्यकर्ते तर म्हणतात की, ‘ज्यांना मागील पाच वर्षांत गुत्तेदाऱ्या दिल्या त्यांनाच आता प्रचाराला बोलवा’, असे खडे बोल कार्यकर्त्यांकडून ऐकविले जात असल्यामुळे उमेदवारांना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम करावे लागत आहे.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आला, खर्चही झाला. मात्र या विकास कामांचे गुत्ते कोणाला दिले? यावरुन कार्यकर्ते खल घालत आहेत. ज्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला नेत्यांनी विकास कामांचे ठेके दिले. त्यांनी बहुतांश ठिकाणी निकृष्ट कामे केली असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रचार रणधुमाळीत सर्वसामान्य कार्यकर्ते उतरतील का? उतरले तर मनातून काम करतील का? याबाबत सर्वच पक्षातील उमेदवारांना संभ्रम वाटत आहे. (प्रतिनिधी)