छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:09 IST2025-06-25T14:09:46+5:302025-06-25T14:09:59+5:30

नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाचा स्वहिस्सा, हुडकोकडून ८.९० टक्के दराने कर्जाला मंजुरी; दरमहा १७ ते १८ कोटींचा हप्ता द्यावा लागणार

Cabinet approves loan of Rs 822 crore from HUDCO to Chhatrapati Sambhajinagar Municipality, monthly installment of Rs 18 crore | छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी

छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिकेला स्वहिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील काही वर्षांपासून ही रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात मिळावी यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला ८२२ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. हुडकोकडून हे कर्ज मनपाला ८.९० टक्के दराने मिळेल. या कर्जाचा हफ्ता दरमहा किमान १७ ते १८ कोटी रुपये राहणार आहे.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत केंद्र शासन २५ टक्के, राज्य शासन ४५ टक्के आणि मनपा ३० टक्के रक्कम देईल असे ठरले. त्यानुसार कोरोना संसर्गापूर्वी काम सुरू झाले. महापालिकेने आपल्या हिश्शाची रक्कम टाकलीच नाही. कारण एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील २ वर्षांपासून बिनव्याजी कर्ज मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी राज्य शासनाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला हुडकोकडून ८.९० टक्के दराने ८२२ कोटी २२ लाख रुपये मंजूर केले. या कर्जाचा दरमहा हप्ता किमान १७ ते १८ कोटी रुपये येईल. एवढी मोठी रक्कमही मनपाला अदा करणे शक्य होणार नाही.

-योजनेचा एकूण खर्च
-२७४० कोटी रुपये-केंद्र सरकार हिस्साः २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)
- राज्य शासन हिस्साः ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख)

- महापालिकेचा हिस्साः ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)

आतापर्यंत कोणाचा किती निधी प्राप्त
शासन....... एकूण हिस्सा..... दिलेला निधी..... प्रलंबित निधी (आकडे कोटीत)

केंद्र.............६८५ ------------६४६------------- ३९
राज्य....... १२३३---------------- ११६१------------७२
मनपा........८२२------------------०००-------------८२२

Web Title: Cabinet approves loan of Rs 822 crore from HUDCO to Chhatrapati Sambhajinagar Municipality, monthly installment of Rs 18 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.