शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्य खरेदी; पालकांची लगबग सुरू

By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST

बीड: सध्या पुस्तकांच्या दुकानात पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे.

बीड: सध्या पुस्तकांच्या दुकानात पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा वीस टक्क्यांनी पुस्तकांच्या किमती वाढल्या असल्याने आपल्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करताना पालकांना महागाईची झळ बसत आहे. असे असले तरी पुस्तकांच्या दुकानांत पालकांनी गर्दी केली असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले.उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या, आता शाळेची तयारी सुरू झाली असून सोमवारी बीड शहरातील पुस्तकांची दुकाने हाऊसफुल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. १६ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत. आतापासूनच बच्चेकंपनी वर्षभर लागणाऱ्या शालेय साहित्याची जमवाजमव करण्याच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये गणवेश, वॉटरबॅग, शॅग, वह्या पुस्तके, पेन खरेदीसाठी पालकांबरोबर बाजारात गर्दी करत आहेत. मुलांच्या हट्टामुळे पालकांचे बजेट बिघडलेएका विशिष्ट कंपनीचीच वही अथवा स्कूलबॅग घेण्यासाठी मुलं हट्ट करत असल्याने पालकांना मुलं म्हणतील तीच स्कूलबॅग घेवून देणे भाग पडत आहे. यातच गतवर्षीच्या तुलनेत वह्या पुस्तकांमध्ये वीस टक्क्यांची वाढ झालेली असल्याने पालकांना मुलांच्या हट्टामुळे ते म्हणतील, तेच घ्यावे लागत असल्याने पालकांचे महिन्याचे अर्थिक बजेट बिघडत असल्याचे काही पालकांनी सांगितले.चायनाच्या स्कूलबॅगला मागणीवेगवेगळ्या आकाराच्या व आकर्षक दिसणाऱ्या स्कूलबॅग बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये चायना स्कूलबॅगला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे शालेय पुस्तके व साहित्याचे विक्रेते अतुल दहिवाळ यांनी सांगितले. यामध्ये २०० पासून ७०० रुपयांपर्यंत चायना स्कूल बॅग उपलब्ध आहे. इंडियन स्कूल बॅगच्या किमती जास्त असल्याने पालक चायना स्कूल बॅगलाच पसंती देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदलइयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामुळे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रम अभ्यासणार असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे मुलांमध्ये उत्साह असल्याचे सोमवारी शालेय खरेदीच्या दुकानात पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेजिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन मोफत पाठ्यपुस्तके देत असल्याने गरीब विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होतो. यावर्षीदेखील ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देणार असल्याने बाजारात जिल्हा परिषद शाळेतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी पुस्तक खरेदीला येत नाहीत. मात्र इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना बाजारातूनच पुस्तक खरेदी करावे लागत आहे. पुस्तकांबरोबरच स्कूल बॅग, वॉटरबॅग, कंपास विद्यार्थी व पालक खरेदी करीत आहेत.