शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेले सिलिंडर रस्त्यावर

By admin | Updated: September 21, 2014 00:14 IST

औरंगाबाद : मकाईगेटलगत एका जणाने चक्कपेट घेतलेले गॅस सिलिंडर रस्त्यावरच फेकले. वेळीच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सिलिंडरची आग विझविली.

औरंगाबाद : मकाईगेटलगत एका जणाने चक्कपेट घेतलेले गॅस सिलिंडर रस्त्यावरच फेकले. वेळीच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सिलिंडरची आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवित हानी झाली असती. घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी भरून देताना हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मकाईगेटच्या बाजूलाच एका ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे घरगुती सिलिंडरमधील गॅस धोकादायक पद्धतीने वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून देण्याचा ‘उद्योग’ सुरू होता. विद्युत मोटारीच्या साह्याने गॅस रिफिलिंगची ही पद्धत अत्यंत धोकादायक मानली जाते. याठिकाणी आज दुपारी एका व्हॅनमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्पार्किंग होऊन सिलिंडरला आग लागली. तेव्हा हा उद्योग करणाऱ्या व्यक्तीने चक्क ते पेटते सिलिंडर रस्त्यावर फेकले. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. पेटते सिलिंडर पाहून रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. दोन्हीकडची वाहतूक जागीच थांबली.घटनेची माहिती अग्निशामक दलाला तात्काळ कळविण्यात आली. अग्निशामक दल येईपर्यंत तेथील नागरिकच नळीने पाणी मारून सिलिंडरची आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते.शिवाय अनेक नागरिक तेथे बघे म्हणून उभे होते. त्यावेळी जर या सिलिंडरचा स्फोट झाला असता तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता. सुदैवाने सिलिंडर फुटले नाही. मग अग्निशामक दलाने जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी ही आग विझविली. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.