बीड बायपासवरील दोन गॅरेज जाळून खाक; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:45 PM2019-12-28T12:45:26+5:302019-12-28T12:46:51+5:30

गॅरेजला पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

Burn two garages on beed bypass; The loss of millions | बीड बायपासवरील दोन गॅरेज जाळून खाक; लाखोंचे नुकसान

बीड बायपासवरील दोन गॅरेज जाळून खाक; लाखोंचे नुकसान

googlenewsNext

औरंगाबाद: बीड बायपासवरील पटेल लाॅन्स जवळील फॉरवर्ड कोच बिल्डर व प्रेसिडेंट मोटर्स या दोन गॅरेजला पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही गॅरेज जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती .

आगीची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले . मात्र गॅरेजमधील ऑईल ,  वाहनाचे ईंधन आणि प्लास्टिक व फायबर वस्त्तूमुळे आग आधिक वेगाने भडकल्याने पाणी अपुरे पडले.त्यानंतर पाण्याचे 3 टॅंकर मागवून बंबात टाकण्यात आले. 

सुमारे तासाभराच्या प्रयत्नमुळे आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमक दलाला यश मिळाले. घटनास्थळी उप अग्नीशमन आधिकारी एल. एम. गायकवाड आणि अन्य जवानानी यासाठी परिश्रम घेतले . यावेळी नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. यात जिवीतहानी झाली नाही.

Web Title: Burn two garages on beed bypass; The loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.