शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा दणका

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.विद्यापीठामार्फत २९ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षेला प्रारंभ झाला. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील २३० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली असून या सर्व केंद्रांसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सह केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २० ते २५ सह केंद्रप्रमुख नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर गेलेच नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाने चौकशी केली असता काही जणांना नियुक्तीचे आदेश पोहोचले नाहीत, तर काहींना प्राचार्यांनी परीक्षेच्या कामासाठी कार्यमुक्त केले नाही. परीक्षेच्या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कारवाई केली जाणार आहे. जेथे सह केंद्रप्रमुख पोहोचू शकले नाहीत, त्या केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. परीक्षेच्या या चार दिवसांच्या कालावधीत गंगापूर, जालना, गेवराई, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉपी करताना सह केंद्रप्रमुख, भरारी पथकांतील सदस्य आणि काही ठिकाणी प्राचार्यांनी पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सर्वच केंद्रांवर कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा अलर्ट असून जो विद्यार्थी कॉपी करताना पकडला जाईल, त्याचा संपूर्ण वर्षाचा ‘परफॉर्मन्स’ रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. दरम्यान, १०- १५ केंद्रे वगळली, तर उर्वरित सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत असल्याचे डॉ. गायकवाड म्हणाले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये कॉपीमुक्ती परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सर्व प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना उद्या पत्र लिहिणार आहेत.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्ती अभियान महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांशिवाय प्राचार्य आणि शिक्षकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याचा उलगडा कुलगुरू हे त्या पत्राद्वारे करणार आहेत.