शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
4
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
5
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
6
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
7
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
8
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
9
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
10
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
11
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
12
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
13
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
14
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
15
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
16
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
17
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
18
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
19
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
20
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह बांधकाम, रस्त्यावर अधिक भर

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

सतीश जोशी , परभणी चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यात प्रामुख्याने सीसीरोड बांधकाम आणि सभामंडप, सभागृहावर भर दिला आहे.

सतीश जोशी , परभणीचालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यात प्रामुख्याने सीसीरोड बांधकाम आणि सभामंडप, सभागृहावर भर दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून तत्पूर्वी या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.सिमेंट रस्ता बांधकामासाठी आ. सीताराम घनदाट यांनी १४ कामांसाठी ७१ लाख रुपये, आ. मीराताई रेंगे यांनी दहा कामांसाठी ३० लाख रुपये, आ. बोर्डीकर यांनी ९ कामांसाठी २८ लाख रुपये तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ८ कामांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. सिमेंट रस्ता नाली बांधकामासाठी आ. बोर्डीकर यांनी चार कामांसाठी १५ लाख तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ८ कामांसाठी ६२ लाखांंचा निधी प्रस्तावित केला. सिमेंट रस्ता व सिमेंट नाली बांधकामासाठी आ. मीराताई रेंगे यांनी एका कामासाठी ३ लाख, आ. बोर्डीकर यांनी १७ कामांसाठी ७६ लाख तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दोन कामांसाठी ९ लाखांचे प्रस्ताव पाठविले आहेत. छोट्या पुलांच्या बांधकामासाठी आ. घनदाट यांनी एका कामासाठी ७ लाख रुपयांचे काम प्रस्तावित केले आहे. आ.दुर्राणी यांनी आपल्या निधीतून स्मशानभूमी शेडच्या तीन कामांसाठी १८ लाख रुपये प्रस्तावित केले आहेत. आ. बोर्डीकर यांनी सुलभ शौचालयाच्या एका कामासाठी २ लाख रुपये प्रस्तावित केले. सार्वजनिक दिवाबत्तीच्या चार कामांसाठी बाबाजानी यांनी १५ लाख रुपये तर अंगणवाडी-बालवाडीच्या एका कामासाठी १० लाख रुपये प्रस्तावित केले. विधानपरिषद सदस्य आ.दिवाकर रावते यांनीही परभणी जिल्ह्यातील नाला बंधाऱ्याच्या तीन कामांसाठी ३० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. परभणी जिल्ह्यात आ. बोर्डीकर यांनी या आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख रुपयांची, आ. बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८६ लाख रुपयांची तर आ. सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. आचारसंहितेपूर्वी या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून ती पूर्ण करणे आवश्यक आहे. सभामंडपावर अधिक भरजिंतूरचे आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभामंडप ८ आणि सामाजिक सभागृह बांधकामाचे पाच प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यात खालोखाल गंगाखेडचे आ.सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली असून त्यात सभामंडप ८ आणि सामाजिक सभागृह बांधकाम ४ चा समावेश आहे. पाथरीच्या आ.मीराताई रेंगे यांनी त्यांच्या मतदारसंघात सभामंडप बांधकामाचे ९ प्रस्ताव दाखल केले आहेत. विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी सभामंडप बांधकामाचे चार आणि सामाजिक सभागृह बांधकामाचा एक असे पाच प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले आहेत. घनदाट यांनी सभागृह बांधकाम आणि सामाजिक सभागृह बांधकाम यासाठी ७४ लाखांचा निधी, मीराताई रेंगे यांनी ९ कामांसाठी ४७ लाख रुपयांचा निधी, बोर्डीकर यांनी १३ प्रस्तावांसाठी ५० लाख रुपयांचा निधी तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पाच प्रस्तावांसाठी ३४ लाख रुपयांचा निधी सभामंडप बांधकाम आणि सामाजिक सभागृह बांधकाम यासाठी प्रस्तावित केला आहे. यानंतर आमदार महोदयांनी आपली पसंदी सीसी रोड बांधकामासाठी दिली आहे.