शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या भीतीने बिल्डर कासलीवाल, रुणवाल पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:55 IST

फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून अटकेच्या भीतीने बिल्डर संजय कासलीवाल आणि सुयोग रुणवाल पसार झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून अटकेच्या भीतीने बिल्डर संजय कासलीवाल आणि सुयोग रुणवाल पसार झाले आहेत. पोलीस युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत आहेत.याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले म्हणाले की, शहरातील अनेक बिल्डरांनी शहरातील फ्लॅटधारकांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना मुदतीत फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केल्याच्या तक्र ारी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत आहेत. तक्रारींची गंभीर दखल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून घेतली जाते. तक्रारीच्या अनुषंगाने बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश त्यांच्याकडून प्राप्त होत असतात. अशा प्रकारे आतापर्यंत बिल्डर मांडे, बिल्डर कैलास बारवाल यांना पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली, तर बिल्डर समीर मेहता याच्याविरुद्धही आठ ते दहा दिवसांत तब्बल फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. मेहता सध्या पोलीस कोठडीत आहे. व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून जालना येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यावसायिकाची ८ कोटी ५१ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर संजय कासलीवालविरुद्ध २३ जून रोजी क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखा मागील काही महिन्यांपासून या तक्रारीची चौकशी करीत होती. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बिल्डर कासलीवालने कोर्टात धाव घेतली. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यास अटकपूर्व जामीन नाकारला. तेव्हापासून कासलीवाल पसार झालेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.बिल्डर रुणवालविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यात रुणवाल यासही सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. तेव्हापासून अटकेच्या भीतीपोटी हे आरोपी पसार झाले असल्याचे पो.नि. नवले म्हणाले. आरोपींचा आम्ही शोध घेत असून, ते शहराबाहेर पळून गेल्याचे ते म्हणाले.