शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

‘अर्था’चा झाला अनर्थ; औरंगाबाद महानगरपालिकेला अर्थसंकल्प फुगविण्याची भारी हौस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 6:41 PM

पन्नास टक्केही अंमलबजावणी होत नसताना दरवर्षी फुगविले जाते ‘बजेट’

ठळक मुद्देमागील वर्षी प्रशासनाने १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिकेच्या तिजोरीत ८०० कोटींपेक्षा अधिक निधी येत नाही. . दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्पावर निव्वळ चर्चा होते. मुळात मनपा प्रशासनाकडूनच फुगीर अर्थसंकल्पाला चालना देण्यात येते.

औरंगाबाद : महापालिका दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडत असते. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यामध्ये आणखी पाचशे कोटी रुपयांची वाढ करणार, हे निश्चित. दरवर्षी मनपाचा अर्थसंकल्प मार्चअखेरीस थेट जमिनीवर येतो हे सर्वश्रुत असतानाही फुगीर अर्थसंकल्प तयार करण्याची हौस पूर्ण होत नाही.

महापालिकेच्या तिजोरीत शासन अनुदान, मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना आदी विभागांकडून ८०० कोटींपेक्षा अधिक निधी येत नाही. ४०० कोटी पगारावर खर्च होतात. २०० कोटी रुपये विजेचे बिल, पाणीपुरवठा, घनकचरा आदी अत्यावश्यक गरजांवर खर्च करण्यात येतात. विकासकामांसाठी २०० कोटींपेक्षाही कमी निधी शिल्लक राहतो. मागील अनेक वर्षांपासून या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली नाही आणि भविष्यातही होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, औरंगाबादकरांना दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात मनपा प्रशासन, पदाधिकारी दिवास्वप्न दाखवितात. दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्पावर निव्वळ चर्चा होते. प्रत्यक्षात कृती अजिबात होत नाही. मुळात मनपा प्रशासनाकडूनच फुगीर अर्थसंकल्पाला चालना देण्यात येते. त्यामुळे पदाधिकारी त्यावर ‘कळस’ चढविण्याचे काम करतात. 

२०१९-२० या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्थायी समितीला सादर केले. या अर्थसंकल्पात प्रशासनाने पाणीपुरवठा योजना, घनकचरा प्रकल्प, हरित औरंगाबाद, जलसिंचनची कामे, उदयोन्मुख खेडाळूंना वाव देणे, स्मार्ट सिटी, सफारीपार्क, वाहतूक सिग्नल अत्याधुनिक करणे, रस्त्यांची कामे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, अग्निशमन विभाग बळकटीकरण, मनपा शाळांचा दर्जा उंचावणे, आरोग्य सुविधा बळकट करणे, महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे आदी घोषणांचा अक्षरश: पाऊसच पाडण्यात आला आहे. कागदावर हा अर्थसंकल्प अत्यंत गोंडस वाटतो. वर्ष संपत आल्यावर हाच गोंडस अर्थसंकल्प काटेरी झाडाप्रमाणे दिसू लागतो.

१८०० कोटींवरून ८३१ कोटींवर आलेमागील वर्षी प्रशासनाने १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यात स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने मिळून तब्बल ६६४ कोटी रुपयांची वाढ केली होती. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी मागील वर्षीचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला तेव्हा ८३१ कोटी ४३ लाखांचे अंदाजपत्रक देण्यात आले. प्रशासन, पदाधिकाऱ्यांसाठी ही मोठी नामुष्की आहे.

अर्थसंकल्पातील कामे सोशल मीडियावरमागील वर्षीचेच उदाहरण द्यायचे तर प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील पाच ते सहा कोटी रुपयांची कामे अर्थसंकल्पात घुसडली. अर्थसंकल्प पुस्तिकेत आलेल्या कामांची यादी सोशल मीडियावर टाकून नगरसेवकांनी स्वत:ची पाठही थोपटून घेतली. वर्षअखेरीस त्यातील चार कामेही झालेली नाहीत. पुढील वर्षभरातही ही कामे होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

मागील पाच वर्षांची अवस्थावर्ष     अंतिम अर्थसंकल्प    अंतिम अर्थसंकल्प२०१४-१५    ७७० कोटी    ४४७ कोटी२०१५-१६    ९५२ कोटी    ७९५ कोटी२०१६-१७    १०७६ कोटी    ६५० कोटी२०१७-१    १४०० कोटी    ८०० कोटी२०१८-१९    १८६४ कोटी    ८३१ कोटी

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीBudgetअर्थसंकल्प 2023Aurangabadऔरंगाबाद