शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला ब्लॅकमेल करणारा जेरबंद

By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST

औरंगाबाद : माझ्यासोबत तू बोलत जा. नाही बोललीस तर तुझे अश्लील व्हिडिओ फेसबुकवर टाकीन, अशी धमकी देत एका विवाहितेला ब्लॅकमेल करणार्‍या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले.

 औरंगाबाद : माझ्यासोबत तू बोलत जा. नाही बोललीस तर तुझे अश्लील व्हिडिओ फेसबुकवर टाकीन, अशी धमकी देत एका विवाहितेला ब्लॅकमेल करणार्‍या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले. कपिल गोविंदराम ललवाणी (३०, रा. छाजेडनगर, कन्नड), असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कपिल ललवाणी याने एका महिलेच्या मोबाईलवर सतत संपर्क साधून तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने त्या महिलेला धमक्याही दिल्या. अशा प्रकारे सतत ब्लॅकमेल करणार्‍या या भामट्याच्या छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने सायबर क्राईमचे निरीक्षक गौतम पातारे यांचे कार्यालय गाठले. तिथे तिने त्या भामट्याविरुद्ध लेखी तक्रार दिली. याशिवाय ७ मे रोजी त्या भामट्याने सदरील महिलेच्या व्हॉटस्अपवर पाठविलेल्या महिलांच्या दोन अश्लील फोटोच्या प्रिन्टही पोलिसांना सादर केल्या. त्यानुसार निरीक्षक गौतम पातारे व त्यांच्या पथकातील कर्मचारी सय्यद रफिक, धुडकू खरे, रेवननाथ गवळी, गणेश वैराळकर, रवींद्र खरात, नितीन देशमुख, ज्योती भोरे आदींच्या पथकाने सदरील भामट्याच्या मोबाईलवरून त्याचा शोध घेतला. तो कन्नड येथील रहिवासी कपिल गोविंदराम ललवाणी हा ३० वर्षीय युवक निघाला. त्याला अटक करून छावणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तुझ्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर ते फोटो फेसबुकवर अपलोड करीन. तुझे व तुझ्या पतीचे अश्लील व्हिडिओही माझ्याकडे आहेत. तुझे एवढे हाल करीन की, तुला तुझा पती सोडून देईल.