शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

टायपींग परीक्षेत दलालांची लुडबूड

By admin | Updated: December 3, 2015 00:38 IST

संजय तिपाले / सोमनाथ खताळ, बीड टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत कोणीही या अन् परीक्षा देऊन जा... असा सावळा गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थ्यांच्या गर्दीत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढली आहे.

संजय तिपाले / सोमनाथ खताळ, बीडटंकलेखन व लघुलेखन परीक्षेत कोणीही या अन् परीक्षा देऊन जा... असा सावळा गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थ्यांच्या गर्दीत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे परीक्षार्थी कोण अन् टंकलेखनाच्या ‘स्पीड’चे गुत्ते घेणारे दलाल कोण? यात फरक करणे अवघड बनले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी बुधवारी एका केंद्रावर केलेल्या स्टींगमधून टायपींग परीक्षेचा कसा बाजार भरला आहे याचा पर्दाफाश झाला.आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने टंकलेखन व लघुलेखन परीक्षेला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षांमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता शहरातील बार्शी नाका परिसरातील अशोकनगर जि.प. केंद्रीय शाळेच्या केंद्रात ‘लोकमत’ प्रतिनिधी धडकले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ काही तरुण- तरुणी उभे होते. केंद्रातून कोणीही ये- जा करत होते. प्रतिनिधी प्रवेशद्वारातून थेट केंद्रात पोहोचले. तेथे आधीच काही तरुणांची ये- जा सुरु होती. प्रतिनिधी गर्दीतून वाट काढत पुढे गेल्यावर केंद्रात कोण परीक्षार्थी व कोण बाहेरचा व्यक्ती ? हे कळायलाच मार्ग नव्हता. प्रतिनिधी तेथे रेंगाळले, आतमध्ये जाऊन आले; परंतु कोणी हटकले देखील नाही. केंद्र पर्यवेक्षक बाहेर खुर्च्या टाकून बसलेले होते. ये- जा करणाऱ्या तरुणांचा गोंधळ वाढल्यानंतर एक पर्यवेक्षक तेवढे आले अन् गोंंधळ करु नका खाली जा... एवढाच सल्ला त्यांनी दिला. एवढ्यात एक संस्थाचालक पुढे आला अन् त्याने तरुणांना खाली नेले. नंतर प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. एकूणच केंद्रावरील सारा माहोल संशयास्पद होता.विशेष म्हणजे केंद्रात प्रवेश देताना प्रवेशपत्र तपासणे गरजेचे आहे, ते देखील तपासले जात नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधी आदित्यनगरीतील व्यंकटेश स्कूलमधील केंद्रावरही गेले होते; तेथे दोन पोलिस बंदोबस्त करत होते. मात्र, केंद्राला यात्रेचे स्वरूप होते. गर्दीने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. १०० मीटरच्या आत लोक उभे होते.याबाबत शिक्षणाधिकारी (मा.) एस. पी. जैस्वाल म्हणाले, अशोकनगर केंद्रावर असे काही घडले असेल तर माहिती घेतो. पोलीस बंदोबस्त मागविला होता. यापुढे योग्य ती काळजी घेण्यात येईल.