अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या दोन नराधमांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:11 IST2018-12-07T22:09:39+5:302018-12-07T22:11:12+5:30

दोन अल्पवयीन मुलींना खोटे नावे सांगून त्यांना पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार करून पसार झालेल्या दोन नराधमांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली.

Both of them were arrested for torturing minor girls | अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या दोन नराधमांना अटक

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या दोन नराधमांना अटक


औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील दोन अल्पवयीन मुलींना खोटे नावे सांगून त्यांना पळवून नेत त्यांच्यावर दोन दिवस अत्याचार करून पसार झालेल्या दोन नराधमांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली.


समीर लाल शहा (रा.बोडखा, ता. खुलताबाद)आणि सचिन उर्फ सतीश राजू पवार (वय २३,रा. माणिकनगर, नारेगाव)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले की, नारेगाव परिसरातील आनंदगाडे नगर येथील १३ आणि १४ वर्षांच्या मुलींसोबत आरोपींनी खोटी नावे सांगून ओळख वाढविली. समीरने त्याचे पूर्ण नाव सांगितले नव्हते तर सतीशने त्याचे नाव सचिन सांगितले होते.

त्यांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोघींना पळवून नेले होते. मुलींना चौका घाट परिसरात दोन दिवस ठेवून नराधमांनी त्यांच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांना एमआयडीसी परिसरात आणून सोडत ते पसार झाले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

आरोपींची पूर्ण नावे मुलींना माहीत नव्हते. शिवाय त्यांनी दिलेली नावेही बनावट असल्याचे समोर आल्याने त्यांचा शोध घेताना पोलिसांना अडचणी आल्या. मुलींवर अत्याचार करणाºया एक आरोपी वाहनचालक असून तो बोडखा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बोडखा येथे जाऊन समीरला अटक केली. त्याची कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत सचिन नाव असलेला आरोपी सतीश राजू पवार असल्याचे सांगितले. पोलिसांनी सतीशला शोधून काढून त्याला बेड्या ठोक ल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक माळाळे ,उपनिरीक्षक साधना आढाव, कर्मचारी मुनीर पठाण, शाहेद शेख, गणेश राजपूत, श्ािंदे, सुंदर्डे यांनी केली.

Web Title: Both of them were arrested for torturing minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.