अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By Admin | Updated: March 27, 2016 23:48 IST2016-03-27T23:44:01+5:302016-03-27T23:48:56+5:30
आखाडा बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात २७ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाभळीच्या झाडाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला.

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
आखाडा बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात २७ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाभळीच्या झाडाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला.
कामठा पाटीवरून येलकीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याचे वय अंदाजे ६५ वर्षे आहे. येलकी येथील पोलिस पाटील कैलास चौतमल यांनी दिलेल्या माहितीवरून बाळापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नागरगोजे करीत आहेत. मयताची ओळख रात्री उशिरापर्यंत पटविण्यात यश आले नव्हते.
एकास मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा
कुरूंदा : घरगुती भांडणावरून एकास चौघांनी संगनमत करून फायटरने मारहाण केल्याची घटना २४ मार्च रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे घडली.
कुरूंदा येथील नरसिंग आंबटवार यांच्या घरात चौघांनी अनाधिकृतरित्या प्रवेश करत, तुझ्या पत्नीला वसमत येथे येऊन नांदव असे म्हणत त्यांना फायरटने मारहाण करून डोळ्यास दुखापत केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आंबटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतीश चौव्हटेवार, अनिल चौव्हटेवार, शशिकलाबाई चौव्हटेवार, शितल चौव्हटेवार (सर्व रा. वसमत) यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जमादार भगवान वडकिल्ले करीत आहेत. (वार्ताहर)