शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:32 IST

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : फळे ही शरीरासाठी आरोग्यदायी असतात; परंतु काही फळे रिकाम्यापोटी खाल्ल्यास काहींना पोटफुगी, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशी फळे रिकाम्यापोटी खाणे टाळली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

काही फळे उष्ण; काही आम्लधर्मीकेळी, पपई यासारखी फळे उष्ण असतात. संत्री, मोसंबी, अननस ही आम्लधर्मी फळे आहेत. ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने काहींना त्रास होऊ शकतो. पपई शरीरातील उष्णता वाढवते. उन्हाळ्यात रिकाम्यापोटी पपई खाल्ल्यास घशाला कोरड पडणे, शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.

रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास....रिकाम्यापोटी संत्री खाल्ल्यास काही जणांमध्ये ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ किंवा पित्त वाढल्यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेकांना रिकाम्यापोटी आंबट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

फळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबरफळांमध्ये नैसर्गिक आम्ल अन् फायबर असते. फळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात कोणती फळे खाल?उन्हाळ्यात मोसमी आणि थंड प्रकृतीची फळे खाणे फायदेशीर असते. कलिंगड, खरबूज, सफरचंद, आंबा (मर्यादित प्रमाणात), डाळिंब आदी फळे खाल्ली पाहिजे.

नाश्त्याला फळे खाणे योग्य की अयोग्य?नाश्त्यामध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्याबरोबर जेवणातही फळांचा समावेश असणे, हे अधिक उपयुक्त ठरते.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंटफळांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. शरीराच्या शुद्धीकरणात ते फायदेशीर ठरते. उपाशीपोटी फळे खाल्ली तरी चालतात. प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. उपाशीपोटी फळ खाल्ले तर त्रास होतो, असे नाही. मात्र, एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर तो फळामुळे होत असेल.- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ, घाटी रुग्णालय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रHealthआरोग्य