शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:32 IST

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. या प्रकारामुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत. हे काम साध्या खोदकामाच्या मर्यादेत न राहता थेट स्फोटके वापरून केले जात आहे. गुरुवारी दुपारी अडीच- तीनच्या सुमारास जोरदार आवाजांनी हा संपूर्ण परिसर हादरला. या प्रकाराची काहींनी थेट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. ब्लास्टिंगचा थेट परिणाम लेणीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातून लेणीतील शिल्पांना आणि त्यांच्या संरचनेस हानी पोहोचण्याची भीती अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि पुरातत्त्वप्रेमींनी व्यक्त केली.

या भागात कोणत्याही प्रकारच्या विकासकामांसाठी पुरातत्त्व, जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. सध्या सुरू असलेल्या कामांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दोन जोरदार ब्लास्टदुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान दोन जोरदार ब्लास्ट झाले. हे बुद्ध लेणीपासून २०० ते ३०० मीटरच्या आतच झाल्याची स्थिती आहे. हा प्रकार लेणीसाठी धोकादायक ठरू शकतो. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे.- भीमराव हत्तीअंबिरे, संस्थापक अध्यक्ष, संबोधी अकादमी

पाहणी करू : पुरातत्त्व सर्वेक्षणलेणीपासून ३०० मीटरच्या आत असेल, तर आम्हाला कारवाई करता येईल. जेसीबीच्या मदतीने रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी खोदकाम सुरू असून, ते ३०० मीटरच्या बाहेर असल्याचे समजते. परिसराची पाहणी करून खात्री केली जाईल, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परवानगी नाहीबुद्ध लेणी परिसरात होणाऱ्या ब्लास्टिंगसाठी माझ्या कार्यकाळात तरी परवानगी देण्यात आलेली नाही.- अनिल घनसावंत, गौण खनिज अधिकारी

लेणीला धोकाचहनुमान टेकडी ते बुद्धलेणी दरम्यानचा भाग पूर्वी ग्रीन झोन होता. तेथे साधा खड्डाही खोदता येत नव्हता परंतु आता या भागाला ‘यलो झोन’ म्हणून अंतिम मान्यता मिळण्याआधीच खोदकाम, ब्लास्टिंगचा प्रकार सुरू आहे. त्यातून लेण्यांला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.- डाॅ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

...तर पुन्हा दुरुस्ती अशक्यलेणी स्थापत्य हा आपला वारसा ठेवा आहे. लेणी परिसरात स्फोटकांचा वापर केल्यास लेण्यांला भेगा पडणे, लेण्यांतील खांब कोसळणे, दरडी कोसळणे, असा धोका होऊ शकतो. असे काही झाले तर त्याची आपण पुन्हा दुरुस्तीही करू शकणार नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे.- श्रीकांत उमरीकर, संयोजक, मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad caveऔरंगाबाद लेणी