शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:49 IST

लोकमत इॅम्पॅक्ट : महसूलच्या वतीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याच्या धक्कादायक प्रकारात अखेर स्फोट घडवणाऱ्या चार जमीनधारकांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

जीवनलाल कुंदनलाल डोंगरे, पृथ्वीराज कुंदनलाल डोंगरे, प्रेमराज कुंदनलाल डोंगरे व हंसराज कुंदनलाल डोंगरे (सर्व रा. तारकस गल्ली, बेगमपुरा), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रेमराजला अटक केल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले. महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी दगडू जरारे (५४) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याने या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी ‘बुद्ध लेणीला हादरे, अवैध ब्लास्टिंग रोखणार कोण?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खंडपीठाने दखल घेतली आणि ते ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली. खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली. जरारे यांनी तक्रारीत नमूद माहितीनुसार, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर त्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला. पाहणीत आरोपींच्या सर्व्हे क्रमांक २३४ मधील जमिनीवर कणखर दगड फोडल्याचे दिसून आले. परिसरात दगडाचे बारीक तुकडेदेखील होते. डोंगरे कुटुंबाला याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडे स्फोटासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे समोर आले.

प्रशासनाने जमिनीविषयी माहिती मिळवलीचारही आरोपींनी जमीन सपाटीकरणाची परवानगी मिळाल्याचे सांगितले. सदर पडीत जमीन चौघांच्या सामाईक क्षेत्रातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महसूल विभागाने सदर घटनेचा पंचनामा केला. मंडळ अधिकारी कल्याण वानखरे यांच्या आदेशावरून जरारे यांनी फिर्याद दाखल केली.

काय ठेवलाय ठपका?आरोपींवर बारीपदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत ३(अ), बीएनएस १२५ व २८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील शाळा, नागरिकांच्या मालमत्तांना हानी पोहोचवून जीवितास धोका निर्माण होईल, असे बेकायदेशीर व हलगर्जीपणाचे कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. एफआयआर दाखल करताना तक्रारीत ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे.

एकास अटक, बाकी पसारगुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींपैकी प्रेमराज डोंगरे याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले. दरम्यान, अन्य आरोपी पसार झाले असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabad caveऔरंगाबाद लेणी