शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

परळीमध्ये धडाडल्या तोफा

By admin | Updated: April 23, 2015 00:49 IST

परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडल्या

परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडल्या. पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे पहिल्यांदाच या निवडणुकीत समोरासमोर आले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तळेगाव येथे सभा घेतली. अध्यक्षस्थानी नरसिंगराव सांगळे होते. आ.आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, अ‍ॅड. यशश्री मुंडे, फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, बंकट कांदे, डॉ. शालिनी कराड यांची उपस्थिती होती. या सभेत पंकजा यांनी बाजार समिती कर्जमुक्त केल्याचा दावा सांगणाऱ्यांनी सुतगिरणी का वाचविली नाही? असा रोकडा सवाल उपस्थित केला. सुतगिरणीतून केवळ पहेलवान पोसले असून गुंडगिरीला खतपाणी घातल्याचा घणाघातही केला. सुतगिरणी बंद पडल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले, असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मारला. अ‍ॅड. यशश्री मुंडे यांनीही तोफ डागली. त्या म्हणाल्या, विरोधकांना पराभवाची हॅटट्रीक साधण्याची घाई झाली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी निर्भिडपणे साथ द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.धनंजय मुंडेंचा २४ कलमी जाहीरनामामागील चार वर्षात कारखान्यात गैरव्यवहार झाले असून चौकशीची मागणी करत श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासन देत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी २४ कलमी कार्यक्रम जाहीर केला. या जाहीरनाम्यात पहिल्याच क्रमांकाला संस्थापक स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक कारखानास्थळी उभारण्याचे वचन देऊन त्यांनी ‘गुगली’ टाकली आहे. शेतकऱ्यांसाठी आकर्षक योजनांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी दैठणा, हाळम, हेळंब, धर्मापुरी, कासारवाडी, मांडवा, मरळवाडी, मिरवट येथे दौरा केला.(वार्ताहर)