शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे

By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST

गंगाखेड : येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक शुक्रवारी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली.

गंगाखेड : येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक शुक्रवारी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती काकाणी विजयी झाल्या.दोन महिन्यांपासून नगराध्यक्षपदाची निवडणूक गाजत होती. पुन्हा एकदा राष्ट्रवादी व काँग्रेसला शह देत गंगाखेड पॅटर्नला यश मिळाले आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांना ११ तर भाजपाच्या जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांना १२ मते मिळाली. त्यामुळे भाजपाने नगराध्यक्षपद खेचून आणले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक महत्वाची मानली जात होती. उद्योगपती रत्नाकर गुट्टे, आ. सीताराम घनदाट यांच्या प्रयत्नांमुळे रामप्रभू मुंडे यांना गंगाखेड पॅटर्न राबविण्यात यश मिळाले. डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याकडे राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे चार व अपक्ष एक असे ११ नगरसेवक होते. तर माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्याकडे भाजपाचे ५, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे ४, घनदाट मित्रमंडळाचा एक असे १२ नगरसेवक होते. उपनरागध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती मनोज काकाणी यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार अविनाश शिंगटे, मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांनी सहकार्य केले. अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार, पोलिस निरीक्षक उत्तम चव्हाण आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. नगराध्यक्षपद खेचून आणण्यात यश : गुट्टे केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी येथील नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. परंतु, अचानक त्यांचे निधन झाले. त्यानंतर आ.पंकजाताई पालवे यांनीही माझ्यावर विश्वास टाकला व त्यांच्या सहकार्यामुळेच मी गंगाखेड नगराध्यक्षपद खेचून आणून गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली, असे उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले. ते म्हणाले, गंगाखेड पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी चौकशी करुन ते मागे घ्यावेत, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत. अखेर सत्याचा विजय- रामप्रभू मुंडेगंगाखेड नगराध्यक्षपद हे घरी बसून मिळत नसते. त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात. ते आम्ही केले म्हणून नगराध्यक्षपद भाजपाला मिळाले. या विजयामुळे सत्याचा विजय झाला, असे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी सांगितले.