काँग्रेसच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका; मंत्री कराडांच्या घर, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, पोलीसांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 13:01 IST2022-02-12T12:48:50+5:302022-02-12T13:01:08+5:30

काँग्रेस तशीही संपलेली आहे, हिंम्मत असेल तर कॉंग्रेसने येऊन दाखवावे,

BJP worried about Congress morcha; activists police barricades outside the Minister Bhagwat Karad's house,office | काँग्रेसच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका; मंत्री कराडांच्या घर, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, पोलीसांचे संरक्षण

काँग्रेसच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका; मंत्री कराडांच्या घर, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, पोलीसांचे संरक्षण

औरंगाबाद : काँग्रेसच्या आजच्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या घरावरील मोर्चाचा भाजपने धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. क्रांती चौक परिसरातील नूतन कॉलनी येथील मंत्री कराड यांच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी संरक्षणात्मक कठडे केले आहे. तसेच याठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

देशभरात कोरोना पसरण्यात सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉंग्रेसच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे आज केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कराड यांच्या घरासमोर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्यने जमत आहेत. कराड यांच्या घराला संरक्षण म्हणून भाजप कार्यकर्ते येथे आले आहेत. 

काँग्रेस तशीही संपलेली आहे, हिंम्मत असेल तर कॉंग्रेसने येऊन दाखवावे,  आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप ओबीसी सेलचे बापू घडामोडी केले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंत्री कराड यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: BJP worried about Congress morcha; activists police barricades outside the Minister Bhagwat Karad's house,office