शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मताधिक्य; सेनेत अस्वस्थता

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेच्या वॉर्डांतून मताधिक्य मिळाले. परिणामी, सेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेच्या वॉर्डांतून मताधिक्य मिळाले. परिणामी, सेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. स्थानिक नेत्यांनी नगरसेवकांवर प्रश्नांचा भडिमार करण्यास सुरुवात केली आहे. वॉर्डनिहाय बैठकांत नगरसेवकांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असून, इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देण्याचे प्रमाण वाढले आहे. नवचैतन्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात सेनानेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर यांनी पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डांत भाजपाला मिळालेल्या मतांचा आढावा घेऊन नगरसेवकांचा प्रश्नोत्तरांचा तास घेतला. महापौर कला ओझा यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या वॉर्डातून भाजपाला जास्तीचे मतदान झाल्यावरून नेत्यांनी सर्वांना सद्य:स्थिती काय आहे, हे विचारले होते. वॉर्डांमध्ये नगरसेवकांनी भरपूर कामे केली आहेत. कोट्यवधींची कामे केली, मग त्या तुलनेत शिवसेना उमेदवारांना मते का मिळाली नाहीत, असा सवाल प्रभागांच्या बैठकीत उपस्थित होतो आहे. त्यामुळे नगरसेवकांची पाचावर धारण बसत आहे. हर्सूल, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, गुलमंडी, सुरेवाडी आदी भागांमध्ये सेनेचे पीछेहाट झालेली आहे. महापौरांना तर त्यांच्या वॉर्डात ३०० च्या आसपासच मते मिळाली. मग ज्या भागांमध्ये सेनेचे नगरसेवक आहेत तेथे भाजपा आघाडीवर आणि जेथे भाजपाचे नगरसेवक आहेत, तेथून सेना आघाडीवर दिसते. याचा अर्थ भाजपाच्या वॉर्डात सेनेचे पदाधिकारी अ‍ॅक्टिव्ह आहेत. बैठकीत बिंग फुटत असल्यामुळे नगरसेवकांची पाचावर धारण बसली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला आतून सहकार्य केल्याचा फटका आता मनपा निवडणुकीत विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना बसणार आहे.