भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:47 IST2026-02-25T18:46:49+5:302026-02-25T18:47:27+5:30

पुढील तीन वर्षे फारशा मोठ्या निवडणुका नसल्याने ही कार्यकारिणी केवळ पक्ष कार्यक्रम राबवण्यासाठी म्हणजेच 'कॅरिऑन ॲक्टिव्हर्स' म्हणून काम करेल, अशी चर्चा भाजप गोटात आहे.

BJP State Executive Reshuffle: Marathwada Misses Out on General Secretary Post; Key Changes by Ravindra Chavan | भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी अनेक उलथा-पालथी केल्या. आ. संजय केणेकर यांना सरचिटणीसपदाची अपेक्षा होती; परंतु आमदार असल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. संघटनमंत्री पदावरून सरचिटणीस होण्याची अपेक्षा असलेले संजय कौडगे यांची उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली. कौडगे यांच्या विरोधात मागील तीन वर्षांत अनेक तक्रारी होत्या, त्यामुळे त्यांनी संघटनेत दुय्यम दर्जाचे पद देण्यात आल्याचे दिसते आहे.

कौडगे यांनी छत्रपती संभाजीनगर मनपा पदाधिकारी निवडीत देखील ढवळाढवळ केल्याची चर्चा मध्यंतरी होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला राज्य कार्यकारिणीमध्ये कुठलेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. शिरीष बोराळकर यांना सरचिटणीसपद मिळेल, अशी चर्चा होती; परंतु त्यांनाही पक्षाने डावलले. मराठवाड्यातून उपाध्यक्षपदावर कौडगे यांच्यासह चैतन्यबापू देशमुख, अर्चना पाटील चाकूरकर, प्रवीण घुगे व रेखा कुलकर्णी यांची चिटणीसपदी वर्णी लागली. तसेच इद्रीस मुल्तानी यांची अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी, तर विश्वजित गायकवाड यांची एससी मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एकूण ४३ जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे. मराठवाड्यात एकही सरचिटणीस पद मिळालेले नाही. तीन उपाध्यक्ष व दोन चिटणीसपदांसह अल्पसंख्याक मोर्चा व एससी मोर्चा अध्यक्षपद मिळाले आहे.

संघटनमंत्री संघाच्या मुशीतील असेल...
संघटनमंत्री पदावर संघाच्या मुशीतील पदाधिकारी असेल, असे बोलले जात आहे. अद्याप या पदावर कुणाची वर्णी लागलेली नाही. पुढच्या महिन्यात या पदावर नियुक्ती केली जाईल, असे भाजप सूत्रांनी सांगितले. तसेच २०२९ पर्यंत पक्षसंघटनेत फारसे काम नाही. किरकोळ निवडणुका वगळता संघटनेने दिलेले कार्यक्रम राबविण्याचाच मुख्य अजेंडा पुढील तीन वर्षांत असणार आहे, त्यामुळे ही कार्यकारिणी कॅरिऑन ॲक्टिव्हर्स अशीच असेल, अशी भाजप गोटात चर्चा आहे.

Web Title : भाजपा में बड़ा फेरबदल! दिग्गजों को निराशा, मराठवाड़ा का प्रतिनिधित्व घोषित।

Web Summary : भाजपा की राज्य कार्यकारिणी में फेरबदल हुआ, जिससे कुछ नेता निराश हुए। मराठवाड़ा को उपाध्यक्ष और सचिव पद मिले। संगठनात्मक भूमिकाएँ अभी भी खाली हैं, भविष्य में नियमित गतिविधियों पर ध्यान केंद्रित किया जाएगा। नई टीम में 43 सदस्य हैं।

Web Title : Major reshuffle in BJP! Disappointment for veterans, Marathwada representation revealed.

Web Summary : BJP's state executive saw a reshuffle, disappointing some leaders. Marathwada secured vice president and secretary positions. Organizational roles remain unfilled, with future focus on routine activities. The new team includes 43 members.