प्रियांक खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा आक्रमक; फोटोला जोडे मारून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:28 IST2023-12-08T16:27:09+5:302023-12-08T16:28:54+5:30
कर्नाटक विधानसभेतून सावरकरांचे चित्र हटवण्याची प्रियांक खर्गे यांनी केली होती मागणी

प्रियांक खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा आक्रमक; फोटोला जोडे मारून निषेध
- अमेय पाठक
छत्रपती संभाजीनगर: प्रियांक खर्गे यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर भाजपा आक्रमक झालीय. आज सकाळी शहरातील क्रांती चौकात भाजपच्यावतीने प्रियांक खर्गे यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निदर्शने करण्यात आली.
कर्नाटक विधानसभातून सावरकरांचं तैल चित्र काढण्याची मागणी प्रियांक खर्गे यांनी केली होती. सावरकरांच्या अवमानाविरोधात भाजपच्यावतीने शहरातील क्रांती चौकात प्रियांक खर्गे यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.