शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देगलुरात मोठा मोर्चा

By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST

देगलूर : देगलुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दैनंदिन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास प्रतिबंध घातला आहे़

देगलूर : देगलुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दैनंदिन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास प्रतिबंध घातला आहे़ तळगल्ली परिसरातील तात्पुरत्या भाजीमंडईमध्ये कोणत्याच सुविधा नसल्या कारणाने भाजी विक्रेत्यांची तसेच ग्राहकांचीही मोठी गैरसोय होत आहे़ नगर परिषद प्रशासनाने येथे तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी करीत आपले व्यवसाय बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व धरणे आंदोलन केले़ मागील २०-२५ वर्षांत देगलूर नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र भाजीमंडईचे कोणतेच नियोजन झाले नाही़ तळगल्ली परिसरातील उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर भाजीमंंडई करण्यात आली आहे़ मंडईमध्ये उघड्या नैसर्गिक नाल्या, तेथे शेजारीच असलेल्या नगरेश्वर मंगल कार्यालयाचे सोडण्यात आलेले पाणी यामुळे होणारी दुर्गंधी, डुकरांचा, जनावरांचा मोठा वावर या गैरसोयी असून वीज, पाणी, स्वच्छतागृह यासह शेड यांची कोणतीच सुविधा उपलब्ध केली गेली नाही़ काही विक्रेत्यांनी मोठ्या क्षेत्रफळाच्या जागा ताब्यात घेतल्याने जास्त संख्येने असलेलया भाजी विक्रेत्यांना मोठी अडचण होते़ नगरपरिषदेने सध्याच्या मंडईमध्ये जमिनीचे समतलीकरण त्यावर फरशी अथवा काँक्रीट शेड, प्रखर वीज दिवे, पाणी आणि सर्व विक्रेत्यांसाठी निश्चित जागेचे ओटे यांचे नियोजन केल्यास भाजीपाला विक्रेते व ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे़ मंडईमध्ये मोकाट जनावरांचा शिरकाव होवू नये यासाठी संरक्षक कुंपनाची आवश्यकता आहे़ पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी एक दिवस व्यवसाय बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि तेथे ठिय्या आंदोलन केले़ या मागणीच्या समर्थनासाठी काँग्रेस कार्यकर्ते शशिकांत टेकाळे, एमआयएमचे शफी मामू, सामाजिक कार्यकर्ते नजीरमियाँ तांबोळी यांच्यासह अनेकजण यामध्ये सहभागी झाले होते. (वार्ताहर)