छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाच्या निवडीतही भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बहुमताचे गणित यशस्वीपणे जुळवल्यामुळे सभापती पदाची निवडणूक आता बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने भाजपचा विजय सुकर झाला.
दुपारी दोन वाजेनंतर या निवडींची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
विरोधकांची माघार अन् भाजपची रणनीतीसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गीतांजली पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याने या दोन्ही नेत्यांनी अर्ज दाखल केला नाही. कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपविरोधात मोर्चेबांधणी करतील अशी चर्चा होती, परंतु भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले.
'या' नावांवर पडली निवडीची मोहरभाजपने आपल्या गटातून मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापती पदाची संधी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत असलेले सचिन गरड यांनाही सभापती पद देऊन भाजपने आपली ताकद वाढवली आहे.
जिल्हा परिषदेवर भाजपची घट्ट पकडया विजयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. ग्रामीण भागातील राजकारणात आपला पाया अधिक भक्कम करण्यात भाजपला यश आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे मोठे यश मानले जात आहे. आता नवनिर्वाचित सभापती जिल्ह्याच्या विकासकामांना कशी गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : BJP secured unopposed chairmanship in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad after opposition candidates withdrew. BJP's strategic alliance and support from independent members ensured victory. Meenakshi Pawar, Anita Mote, Balaji Sontakke, and Sachin Garad secured positions. This win strengthens BJP's hold in rural politics.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर जिला परिषद में भाजपा ने निर्विरोध सभापति पद हासिल किया। विपक्षी उम्मीदवारों के नाम वापस लेने से भाजपा की जीत सुनिश्चित हुई। मीनाक्षी पवार, अनिता मोटे, बालाजी सोनटक्के और सचिन गरड ने पद हासिल किए। इस जीत से ग्रामीण राजनीति में भाजपा की पकड़ मजबूत हुई।