मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ६, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ नवीन एमआयडीसींचा प्रस्ताव

By बापू सोळुंके | Updated: August 22, 2025 20:05 IST2025-08-22T20:05:09+5:302025-08-22T20:05:37+5:30

ग्रामीण भागात मिनी एमआयडीसी विकसित करण्यावर भर

Big news! 6 new MIDCs proposed in Beed district, 4 in Chhatrapati Sambhajinagar | मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ६, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ नवीन एमआयडीसींचा प्रस्ताव

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ६, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ नवीन एमआयडीसींचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : विभागातील प्रस्तावित ११ नवीन एमआयडीसींचा विकास करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. यात ६ एमआयडीसीबीड जिल्ह्यात, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, अंबेलोहळ, आरापूर आणि सिल्लोड या ४ नवीन एमआयडीसींचा समावेश आहे. जालना येथे नव्याने अतिरिक्त जालना नावाने आणखी एक एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. यापैकी सिल्लोड एमआयडीसीला मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने ही एमआयडीसी बारगळण्याचे चिन्हं आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले औद्योगिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरने १९८०च्या दशकात ओळख निर्माण केली होती. ऑरिक सिटींतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात पिरॅमल फार्मा, एनएलएमके, ह्योसुंग इंडिया, टाेयोटा-किर्लोस्कर मोटार्स, फुजी इन्फोटेक, ओएरलिकॉन बालझर्स, कोल्हार ग्रुप, पर्किन्स, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल, कॉस्मो आणि वॉरेन रेमेडीज आदी मोठ्या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ऑरिकमध्ये आता औद्योगिक भूखंड शिल्लक नाही. वाळूज, शेंद्रा आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतही पूर्णपणे भरलेली आहे. आगामी कालावधीत येणारे उद्योग मराठवाड्यालाच पसंती देण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकूण ११ नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

कोणत्या एमआयडीसी प्रस्तावित आणि किती हेक्टर
छत्रपती संभाजीनगर जिल्हा

सटाणा एमआयडीसी-
सरकारी जमीन २८.८९ हेक्टर, खासगी जमीन १०९.९२ हे. एकूण- १३८.८१.

संयुक्त मोजणी झाली. जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांसोबत प्राथमिक बैठक झाली. दुसरी बैठक लवकरच.
---------------------------

अंबेलोहळ (ता. गंगापूर) एमआयडीसी
सरकारी जमीन- ३.४० हे., खासगी जमीन- १६७.०९ हे. एकूण १७०.०९ हेक्टर.

जमीन निवड समितीची पहाणी झाली. एमआयडीसीचा प्रस्ताव स्थानिक प्रादेशिक कार्यालयाने महामंडळाकडे पाठविला.
---------------------------------

आरापूर एमआयडीसी
सरकारी जमीन- ९.६० हेक्टर, खासगी क्षेत्र- ७५२.४३ हेक्टर., एकूण- ७६२.०३ हेक्टर. शासनाकडून मंजुरी. शासनाने संबंधित जमीन क्षेत्र एमआयडीसी नोटिफाइड म्हणून अधिसूचनेतून जारी केले. लवकरच भूसंपादन आणि शेतकऱ्यांसोबत जमीन दरासंदर्भात वाटाघाटी.

-------------------------
सिल्लोड एमआयडीसी

एकूण जमीन २९०.९१ हेक्टर. सर्वाधिक खासगी जमीन. चारपैकी तीन गावांतील शेतकऱ्यांचा एमआयडीसीसाठी जमीन देण्यास विरोध.
--------------------------------------------------

जालना टप्पा २ एमआयडीसी
जालना टप्पा २ करिता सरकारी जमीन २२.५० हेक्टर, खासगी ३४६.५९ हेक्टर. एकूण ३६९.१४ हेक्टर. स्थळ पहाणी झाली. जमीन क्षेत्र एमआयडीसी नोटिफाइड करण्यात आले. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर.

-----------------------------------
बीड जिल्हा
पिसेगाव (ता. केज) -
सरकारी जमीन १६ हेक्टर. प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित.

----------------------------
कामखेडा (बीड)
सरकारी जमीन ८२.४७ हेक्टर. भूनिवड समितीची पहाणी झाली. प्रस्ताव मंजुरीसाठी एमआयडीसी मुख्यालयास सादर.
----------------------------------------

आष्टी- पिंप्री
सरकारी जमीन १८.३५ हेक्टर. खासगी २७.४५ हेक्टर. एकूण ४५.८० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी. सर्वेक्षण करण्यात आले.

----------------------------------
सिरसाळा टप्पा २ (परळी वैजिनाथ)
सरकारी जमीन ५० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी.
-------------------

कळवटी, लमान तांडा (अंबाजोगाई)
जमीन ८० हेक्टर. कार्यकारी अभियंता यांचा अहवाल येणे बाकी आहे.

----------------------------
वडवणी एमआयडीसी
जमीन ५० हेक्टर, भूमिअभिलेख आणि एमआयडीसी यांची संयुक्त मोजणी करणे बाकी.

Web Title: Big news! 6 new MIDCs proposed in Beed district, 4 in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.