"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:31 IST2025-10-11T13:29:57+5:302025-10-11T13:31:15+5:30
"२२ दारूच्या दुकाना आहेत याच्या. सर्वांच्या नावर त्याने घेतलेल्या आहेत. हा काय शेतकऱ्यांना मदत करणार? हा शेतकऱ्यांना..."

"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीवेळी, त्यांनी १२० कोटी रुपये वाटले. घरा-घरात जाऊन, किती मतदान आहे? पाच, हे घ्या २५ कोटी, तुमच्याकडे किती? ३०, हे घ्या दीड लाख. असे तर पैसे वाटले आहेत त्याने आणि तो निवडून आला," असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांच्यावर केला आहे. आज छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाच्या वतीने हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. खुद्द उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान खैरे यांनी हा गंभीर आरोप केला.
खैरे म्हणाले, आता लोक मला म्हणतात, हे नाही, ते नाही. मी म्हणतो, ज्या दारूवाल्याला तुम्ही निवडून दिले, त्या दारूवाल्याकडून घ्या मदत, घ्या प्रश्न सोडोवून. त्याला वाचताही येत नाही हो. त्याला लोकसभेत साधं मराठीही वाचता येत नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले. ते छत्रपतीसंभाजीनगरात टीव्ही९ सोबत बोलत होते.
संदिपान भुमरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा हा मोर्चा म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी आहे आणि उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाहीत... असे विचारले असता खैरे म्हणाले, "दारू विकतो हा माणूस, दारू विकतो. २२ दारूच्या दुकाना आहेत याच्या. सर्वांच्या नावर त्याने घेतलेल्या आहेत. हा काय शेतकऱ्यांना मदत करणार? हा शेतकऱ्यांना दारू पाजून उद्धवस्त करतो. याचा मुलगा काल काय बोलला, बोललाना की, मी २० हजार मते बाहेरून आणली. नंतर मला कळलं की, खुद्द उपमुख्यंत्र्यांनी सांगितलं की, अरे बाबा त्याला गप्प बसवा म्हणून. असे हे बाप-लेक आहेत.
खैरे पुढे म्हणाले, "जेव्हा काही शेतकऱ्यांनी याला मारलं होतं. कशाने मारलं? कशासाठी मारलं होतं. जरा माहिती घ्याना आणि ते प्रकरण कशापद्धतीने दाबले, तेही सांगा. नंतर हा बाप आला तेथे, खासदार आला. तर खासदारालाही मारलं. किती क्रूर लोक आहेत, हे बापले? याना आता मी सरळ करेन आता. मी शिवसेना स्थापन केलीय, मी यांना मोठं केलं. आता हे एवढे होत असेल, तर शिवसेनना प्रमुखांच्या आशिर्वादाने त्यांना सरळ करणार मी आता."
काल एकनाथ शिंदे म्हणाले, किती हंबरडे फोडणार? तुम्ही लोकसभेला हंबरडा फोडला, विधानसभेला हंबरडा फोडला, आता जरा हंबरडे शिल्लक ठेवा... असे विचारले असता,खैरे म्हणाले, "आता बघाना म्हणा तुम्ही, आम्ही काय करतो. तुमचे काय काळे होते? तुम्ही कुठे जाता आता. आता जनता चिडलेली आहे. प्रचंड चिडलेली आहे. या निवडणुकीत त्यांना सरळ करणार."