‘सर्वोपचार’च्या इमारतीचे भूमिपूजन
By Admin | Updated: August 26, 2014 00:15 IST2014-08-26T00:15:43+5:302014-08-26T00:15:43+5:30
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या इमारतीचे बांधकाम व ग्रंथालयासाठीच्या प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरणाच्या

‘सर्वोपचार’च्या इमारतीचे भूमिपूजन
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या इमारतीचे बांधकाम व ग्रंथालयासाठीच्या प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन माजी मंंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले़
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अमित देशमुख हे होते़ खासदार डॉ सुनिल गायकवाड, आ़वैजनाथ शिंदे, आ़ विक्रम काळे, महापौर स्मिता खानापूरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख, एस़आर देशमुख, चाँदपाशा इनामदार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ़ दिप्ती डोणगावकर आदी उपस्थित होते़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाचे आता नूतन इमारतीत विस्तारीकरण होणार आहे. शिवाय, या रुग्णालयाला भव्य ग्रंथालयासाठी इमारतीची भव्य वास्तू साकारणार आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी झाले. नेत्र विभागात रुग्ण संख्या आहे. परंतु, इमारतीचा अभाव होता. तो अभाव आता दूर होणार आहे. (प्रतिनिधी)
भूमिपूजन... शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभाग व ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन आमदार दिलीपराव देशमुख, राज्यमंत्री अमित देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले.