शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफिया बोडखे अखेर अटकेत

By admin | Updated: October 9, 2014 00:50 IST

औरंगाबाद : बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकाविण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला भूमाफिया प्रकाश रामराव बोडखेला (रा. उल्कानगरी) बुधवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकाविण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला भूमाफिया प्रकाश रामराव बोडखेला (रा. उल्कानगरी) बुधवारी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शहरातील प्रख्यात मनोचिकित्सक डॉ. कादरी यांची जमीन हाडपल्यानंतर त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना हवा होता. प्रकाश बोडखेविरुद्ध जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडपणे, जमिनीच्या व्यवहारात नागरिकांची फसवणूक करणे, अशा स्वरूपाने अनेक गुन्हे छावणी, जवाहरनगर, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मार्च महिन्यात छावणी पोलीस ठाण्यातही बोडखे व त्याच्या टोळीविरुद्ध डॉ. अजीज कादरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. डॉ. कादरी यांच्या सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जमिनीचे बोखडे आणि त्याच्या टोळीने बोगस कागदपत्रे तयार केली. नंतर त्या जमिनीवर ताबा घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कादरी यांनी विरोध केला असता त्यांच्याविरुद्ध बोडखे व त्याच्या साथीदारांनी विनयभंगाची एक खोटी तक्रार दाखल करायला लावली. नंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी व जमिनीची सेटलमेंट करण्यासाठी दहा लाखाची खंडणी मागितली होती. बोखडे आणि त्याच्या टोळीला वैतागलेल्या डॉ. कादरी यांनी छावणी ठाण्यात फिर्याद दिली. अटक टाळण्यासाठी बोडखे याने न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र, त्याला जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे तो पोलिसांना चकमा देत फिरत होता. तो घरी आल्याची माहिती बुधवारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना खबऱ्याकडून मिळाली. आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, द्वारकादास भांगे, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, विलास काळे, किशोर काळे यांनी त्वरित जाऊन त्याच्या उल्कानगरीतील घरावर छापा मारला. तेथे तो सापडला. त्याला अटक करण्यात आली.बारा जणांना अटकया गुन्ह्यात आतापर्यंत विशाल एडके (रा. पदमपुरा), आग्याकारसिंग बिंद्रा, गौतम पगारे (रा. जटवाडा रोड), शेख रजिओद्दीन निजाम (रा. बिसमिल्ला कॉलनी), मोहंमद नजिरोद्दीन (रा. आसेफिया कॉलनी), शेख सादिक (रा. बुढ्ढीलेन), अब्दूल रहीम (रा. राहत कॉलनी), रवींद्र धुमाळ (रा. बालाजीनगर), अनिल सदाशिवे (रा. रमानगर), लक्ष्मीबाई चव्हाण (रा. देवळाई चौक), रावसाहेब गायकवाड (रा. विटखेडा) व इंद्रजितसिंग या १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी बोडखे हा या टोळीचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले होते.