शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’च्या संचालकांना कोठडी

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतरही ग्राहकास पैसे न दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेच्या १२ संचालकांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़

उस्मानाबाद : मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतरही ग्राहकास पैसे न दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात ‘बीएचआर’ संस्थेच्या १२ संचालकांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़ त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ़ पालकर यांनी ‘बीएचआर’ संस्थेच्या शहरातील शाखेत ६० हजार रूपये व ६५ हजार रूपयांची मुदत ठेव ठेवली होती़ पहिल्या मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मल्टीस्टेटकडे वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे दिले नाहीत़ त्यामुळे संस्थेने आपली फसवणूक केल्याची फिर्याद डॉ़ पालके यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी शहर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून संबंधित मल्टीस्टेट व संचालकांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ संस्थेचे संचालक दुसऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आले होते़ ते जळगाव येथील कारागृहात असल्याने पोलिसांनी वॉरंट काढून बुधवारी प्रमोद भाईचंद रासोयनी, मोतीलाल ओंकार गिरी, दिलीप कांतीलाल चोरडीया, सुरजमल बभुमल जैन, यशवंत ओंकार गिरी, शेख मजान अब्दुल नबी, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, जितेंद्र यशवंत महाजन, भगवान हिरामन वाघ, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील या बारा जणांना ताब्यात घेतले़ अटकेतील १२ जणांना उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तपास सपोनि मानभाव हे करीत आहेत़(प्रतिनिधी)