भोंदू जादूगार सत्तारबाबा जेरबंद

By Admin | Updated: September 21, 2014 00:43 IST2014-09-21T00:26:14+5:302014-09-21T00:43:55+5:30

औरंगाबाद : कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा साहेब खान यासीन खान पठाण पोलिसांच्या हाती लागला.

Bhondu sorcerer sattarabaab martyr | भोंदू जादूगार सत्तारबाबा जेरबंद

भोंदू जादूगार सत्तारबाबा जेरबंद

औरंगाबाद : केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यांतीलही अनेक नागरिकांना जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चारपट करून देतो, असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तारबाबा (४७, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) हा शनिवारी अखेर गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागला.
गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. हर्सूल परिसरात तो तय्यब पटेल नावाच्या व्यक्तीच्या घरी आला असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवा ठाकरे, फौजदार सुभाष खंडागळे, सहायक फौजदार शेख आरेफ, सुधाकर राठोड, प्रकाश काळे, भीमराव पवार, नंदू चव्हाण, फकीरचंद फडे यांनी रात्री हर्सूलमधील त्या घरावर छापा मारला. त्यावेळी तेथे आरोपी सत्तारबाबा तसेच त्याच्या टोळीतील आरोपी तथा त्याचा जावई शेख अशफाक शेख मन्सूर (२७, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) हे दोघे सापडले. शिवाय गुन्ह्यासाठी या आरोपींनी वापरलेली स्कोडा कार (क्र. एमएच-२० एपी- ६३६३) ही सापडली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली.
अनेक पोलिसांची नावे समोर येणार
सत्तारबाबाच्या टोळीत काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आलेले आहे. सत्तारबाबा व त्याचे साथीदार पैशांचा पाऊस पाडून पैसे चारपट करून देण्याचे आमिष दाखवून ग्राहक शोधून आणायचे. मग एखाद्या ठिकाणी ते जादूचा खेळ मांडायचे. खेळ सुरू होताच पोलीस तेथे छापा मारायचे आणि सगळे काही लुटून न्यायचे. मग पोलिसांनी नेले, मी काय करू असे म्हणून बाबा हात वर करायचा.
तक्रारदार पोलिसांकडे गेले तर पोलीस त्यांची तक्रारही घेत नसत. कारण पोलीसच या टोळीत सहभागी होते. अशाच पद्धतीने बाबा व त्याच्या पोलीस टोळीने अनेकांना गंडविले आहे. या टोळीत कोणते पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत, हे आता बाबाच्या अटकेमुळे समोर येणार आहे.

Web Title: Bhondu sorcerer sattarabaab martyr