शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भीमसागर उसळला

By admin | Updated: April 15, 2016 01:44 IST

नांदेड : कोटी कोटी दलित, शोषित, वंचितांच्या पाठीवर आत्मभान व आत्मविश्वासाची शिदोरी बांधून त्यांना गुलामगिरीच्या शृखंलेतून मुक्त करणारे प्रज्ञासूर्य, महामानव

नांदेड : कोटी कोटी दलित, शोषित, वंचितांच्या पाठीवर आत्मभान व आत्मविश्वासाची शिदोरी बांधून त्यांना गुलामगिरीच्या शृखंलेतून मुक्त करणारे प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गुरूवारी भीमसैनिकांचा महासागर नांदेडच्या रस्त्यावर उसळला़डीजेच्या तालावर नाचत आणि जयभीमचे नारे देत निघालेल्या मिरवणुकीतील लहानथोरांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले़ युगपुरूषाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत शहर व परिसरातील लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता़ भीमसैनिकांनी सकाळपासूनच रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी गर्दी केली होती़ यावेळी विविध संघटनाचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ विविध सामाजिक व राजकीय संघटना तसेच प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ उन्हाची पर्वा न करता भीमगीतांवर हजारो मुले देहभान विसरून नाचत होते़ रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीतील जल्लोषाच्या लाटा एकामागून एक उसळत होत्या़ शहरातील सर्व भागातून दुपारनंतर मिरवणुका निघाल्या़ मिरवणुकाद्वारे डॉ़ बाबासाहेब यांचा संदेश देणारे फलक तसेच विविध देखावे सादर करण्यात आले़ डॉ़ आंबेडकर, महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध, संविधान, संसद भवन, अशोकचक्र आदींचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते़ लेझीम पथक, पथनाट्याचेही आयोजन मिरवणुकीत केले होते़ हातात पंचरंगी ध्वज, निळा ध्वज घेतलेले तरूण आपल्याच धुंदीत नाचताना दिसत होते़ तरोडानाका, वर्कशॉप, श्रीनगर, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौरस्ता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच जिल्हा परिषदेसमोरील रस्ता गर्दीने फुलून गेला होता़़ सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी थंडपाणी तसेच अन्नदानाची व्यवस्था केली होती़ दरम्यान, शहरात सकाळी ठिकठिकाणी पंचशिल ध्वजारोहण, वंदना व सभांचे आयोजन केले होते़ नवे वस्त्र परिधान करून महिला, पुरूष व लहानमुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला़ बौद्धविहार तसेच घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या़ घरावर विद्युत रोषणाई केली होती़ मान्यवरांनी केले अभिवादनडॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ आ़ अमिता चव्हाण, आ़ डी़ पी़ सावंत, आ़ हेमंत पाटील, जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी कुरेशी, सभापती अमिता तेहरा, बी़ आऱ कदम, मंगला निमकर, विजय येवनकर, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, आयुक्त सुशील खोडवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे, समाजवादी नेते सदाशिवराव पाटील, डॉ. किरण चिद्रावार, प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, प्रा़ बालाजी कोंपलवार, भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, बिशन यादव, आरती पुरंदरे, बीएसपीचे सुरेश गायकवाड, नागेश सावंत, किशोर भवरे, उमेश पवळे, प्रफुल्ल सावंत, राष्ट्रवादीचे डॉ़सुनील कदम, कल्पना डोंगळीकर, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, बापुराव गजभारे, संतोष मुळे, नरेंद्र चव्हाण, सुखदेव चिखलीकर, प्रा़ सदाशिव भुयारे, जयपाल रेड्डी, शिवसेनेचे प्रकाश कौडगे, मिलिंद देशमुख, विनय सगर, माधव पावडे, चंद्रकांत बुक्तरे, विश्वनाथ कडेकर, युसुफ मैनोदिन, प्रवीण खंदारे, शिवा कांबळे, संजय बेळगे, स्वप्नील चव्हाण, वंदना लहानकर, पद्माकर केंद्रे, डॉ़ सुधीर भातलवंडे, कोमवाड, डॉ़ काळभोर, खमितकर, संदीपकुमार सोनटक्के, डॉ़ मिनाक्षी कागडे, रमेश सरोदे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)