सावधान! छत्रपती संभाजीनगरात कडेपठार खंडोबा मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:18 IST2025-08-23T12:12:41+5:302025-08-23T12:18:45+5:30
नागरिकांना वन विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना

सावधान! छत्रपती संभाजीनगरात कडेपठार खंडोबा मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन
छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील कडेपठार खंडोबा मंदिर डोंगर माळरानावर फेरफटका मारत असताना दोघांना अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर बिबट्या नजरेस पडला. दोघेजण वरच्या बाजूला असताना बिबट्या त्यांच्या खालच्या बाजूने चालत होता. अचानक बिबट्या दिसताच घाबरून न थांबता त्यांनी तत्काळ वरचे मंदिर गाठले.
मदतीसाठी धनंजय माळी, दीपक शेळके, सोमिनाथ शिराणे तसेच वनविभागाला संपर्क साधला. सूचना मिळताच दक्ष नागरिक सोमिनाथ शिराणे, धनंजय माळी, दीपक शेळके, रमेश बाहुले तसेच वन विभागाचे शाईनाथ नरोडे व पिंटू नरोडे हे कडेपठार खंडोबा मंदिर परिसरात दाखल झाले. त्यांच्या मदतीने प्रशांत क्षीरसागर व राजेश शिरपूरकर यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी डोंगर परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच विनापरवाना वनक्षेत्रात प्रवेश करू नये, अशा सूचना सोमिनाथ शिराणे यांनी दिल्या आहेत.
खबरदारी बाळगावी...
यावेळी वनक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.