शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजकल्याण’मधून लाभार्थ्यांच्या याद्या गहाळ

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या बेपत्ता झाल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या बेपत्ता झाल्या आहेत. सभापती व अधिकाऱ्यांच्या पाठशिवणीच्या खेळात तब्बल दोन वर्षांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांचा पुरता कोंडमारा जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये निधी दोन वर्षांपासून अखर्चित राहिला आहे. हा निधी अखर्चित राहण्याची कारणे ना जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांनी विचारली ना प्रशासनाला त्यात स्वारस्य दिसले; परंतु यात मागासवर्गीय लाभार्थ्यांना मात्र आर्थिक भुर्दंड बसला. या लाभार्थ्यांना मोठ्या मनस्तापालाही सामोरे जावे लागले असतानाच अपंगासाठीच्या झेरॉक्स मशीन या वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची तयार झालेली एक यादीही गायब झाल्याचे नूतन सभापती शीला चव्हाण यांनी सांगितले आहे. याद्यांचा घोळात घोळसभापतीपदावरून नुकतेच पायउतार झालेले रामनाथ चोरमले यांना अडीच वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लावण्यात यश आले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, त्यांच्याच पक्षाचे गट नेते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि समाजकल्याण समितीच्या सदस्यांशीही चोरमले यांचे फारसे सख्य जमल्याचे कधीच दिसले नाही. आपल्याच मर्जीतले लाभार्थी असावेत, यासाठी त्यांच्यात सतत तनातणी झाली. जाता- जाता चोरमले यांनी झेरॉक्स मशीन योजनेची यादी तयार केली; परंतु त्यावर समाजकल्याण अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्याच केल्या नाहीत. त्यामुळे वाटप रखडले. आता नूतन सभापती चव्हाण यांनी पदभार हाती घेतल्यानंतर ही यादी गहाळ झाल्याचा आरोप केला आहे. पुन्हा एकदा सदस्यांकडून नावे मागविण्याचा पर्याय सुचविला आहे. लाभार्थी जिल्हा परिषदेतगेल्या दोन वर्षांतील सर्वच योजनेतील लाभार्थ्यांशी ‘संपर्क’ साधून चोरमले यांनी प्रस्ताव मागविले होते. प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीपर्यंत या लाभार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागले. विशेषत: दलित सुधार योजनेत कामे घेण्यासाठी सरपंचांची चढाओढ लागली होती. त्यातील निवडक ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर झाले. साधारणत: ७ कोटी रुपयांचे नियोजन झाल्याचे सभापती चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.हे लाभार्थी आता दररोज जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत. यातील अनेक प्रस्ताव योजनेच्या अटी व शर्थींचे उल्लंघन करून मंजूर झाल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. अपंगासाठीच्या झेरॉक्स योजनेतील ५५ लाभार्थ्यांची यादी मी दि.६ सप्टेंबर रोजी तयार करून तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे दिली होती. ती गहाळ होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या माहितीनुसार ही यादी नवीन सभापतीकडेच आहे. यादी बदलण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणून त्यांनी यादीच गहाळ झाल्याचा आरोप केला असावा. -रामनाथ चोरमले, माजी सभापती,समाजकल्याण समितीमागासवर्गीयांच्या योजना राबविण्यात कसूर करण्यास जबाबदार कोण, ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. प्रशासनाने यात काहीही रोखठोक भूमिका घेतली नसल्याने संशय अधिकच बळावतो आहे.