शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओंचा कॅम्प होत नसल्याने चालकांना घालावे लागतात खेटे

By admin | Updated: June 23, 2014 23:54 IST

पाटोदा: येथे आरटीओ कार्यालयाचा कॅम्प होत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या संदर्भात असलेल्या विविध कामांसाठी बीड येथे खेटे घालावे लागतात.

पाटोदा: येथे आरटीओ कार्यालयाचा कॅम्प होत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या संदर्भात असलेल्या विविध कामांसाठी बीड येथे खेटे घालावे लागतात. यापोटी वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. पाटोदा येथे महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्यामुळे येथे पाटोदा तालुक्यासह आष्टी, शिरूर तालुक्यातील नागरिक सातत्याने येत असतात. पाटोदा येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरु करावे अथवा येथे प्रत्येक महिन्यात दोन वेळेस आर.टी.ओं.नी कॅम्प घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून सातत्याने होत आहे. नागरिकांच्या मागणीकडे आर.टी.ओ.चा कानाडोळा असल्याने नागरिकांना मात्र नाहक हाल सहन करावे लागतात. पाटोदा येथे कॅम्प होत नसल्याने आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यातील नागरिकांना बीड येथे जावेलागते. यासाठी ५० कि.मी. ते १५० कि.मी. पर्यंतच्या अंतरावरून जावे लागते. सौताडा, चिंचोली, कोतन, अंभोरा या भागातील नागरिकांना यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याबाबत परवाना, परवान्याचे नूतनीकरण, नवीन वाहनांची नोंदणी, वाहनाची तपासणी, वाहनाचा कर भरणे, वाहन खरेदी- विक्री अशा विविध कामानिमित्त नागरिकांना बीड येथे जावे लागते. ही कामे एक ते दोन चकरांमध्ये होत नसल्याने नागरिकांना पाच ते सहा वेळा खेटे घालावे लागतात. नागरिकांचे असे हाल होऊ नयेत व त्यांचे काम वेळेवर व्हावे यासाठी पाटोदा येथे प्रत्येक महिन्यातून दोन वेळेस आरटीओ कार्यालयाने कॅम्प घ्यावा, अशी मागणी सय्यद रियाज, गणेश शेवाळे, यांच्यासह इतरांनी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ म्हणाले, आर.टी.ओ. कार्यालयाचा कॅम्प येथे घेण्यासाठी त्यांना सूचना देण्यात येतील. तर, आरटीओ खान या संदर्भात म्हणाले की, पाटोदा येथे लवकरच कॅम्प घेण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. (वार्ताहर)