छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:23 IST2026-02-02T14:22:31+5:302026-02-02T14:23:26+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Be careful! In Chhatrapati Sambhajinagar, a scammer lured 16 families with 3 crores by breaking their trust. | छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले

छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेकांना भिशीच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवून माय-लेकाने १६ जणांची तब्बल २ कोटी ९९ लाख २० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नंदाबाई रमेश आधुडे (४५) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (२१ दोघेही रा. व्यंकटेश पार्क, बीड बायपास, मूळ रा. घनसावंगी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी रविवारी दिली.

फिर्यादी जयश्री गजानन गिरी (रा. मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहणारी नंदाबाई रमेश आधुडे ही २०१४-१८ पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमांच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने महिलांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने १२ लाखांची मोठी भिशी सुरू केली. जयश्री गिरी यांनी या भिशीत २० महिने दरमहा ५० हजार रुपये, याप्रमाणे १० लाख भरले. यापूर्वीचे १० लाख आणि हे १० लाख मिळून त्यांचे एकूण २० लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. २०१८ पासून ते जुलै २०२५ पर्यंत या माय-लेकांनी १६ हून अधिक लोकांकडून एकूण २ कोटी ९९ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, गिरी यांच्यासह इतरांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास साहाय्यक निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

या लोकांची फसवणूक
आरोपी माय-लेकाने जयश्री गिरी २० लाख, प्रकाश रणमोडे १४ लाख, नमिता बेंद्रे १७ लाख ५० हजार, विलास माने ३० लाख, नंदा बेंद्रे १५ लाख ५० हजार, चांद पठाण ८ लाख, सावित्री आघाव १९ लाख ८० हजार, ज्योती घोलप २ लाख ७० हजार, छाया चव्हाण ७ लाख ९० हजार, जिजा काळे ६ लाख ५० हजार, गुलाब राठोड १५ लाख ५० हजार, कमलबाई सुरसे २१ लाख ५० हजार, रंजना आघाव १६ लाख २० हजार, सपना मरकड ५० लाख, मीरा फलके ५० लाख, राम घायाळ ४ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यातील ६ लाख ९९ हजार ५०० ऑनलाइन तर २ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रोख नंदाबाई व सौरभकडे जमा केले होते.

Web Title : पोंजी स्कीम: माँ-बेटे की जोड़ी ने ₹3 करोड़ लूटे, विश्वासघात किया

Web Summary : एक माँ और बेटे ने पोंजी स्कीम के ज़रिए 16 परिवारों को धोखा दिया, छत्रपति संभाजीनगर में उनसे ₹3 करोड़ की ठगी की। उन्होंने छोटी योजनाओं के माध्यम से विश्वास हासिल किया, फिर बड़े भुगतान में चूक गए। पुलिस जांच जारी है।

Web Title : Ponzi Scheme: Mother-Son Duo Swindle ₹3 Crore, Betray Trust

Web Summary : A mother and son lured 16 families with a Ponzi scheme, defrauding them of ₹3 crore in Chhatrapati Sambhajinagar. They gained trust through smaller schemes, then defaulted on larger payouts. Police investigation is ongoing.