शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कोरोना, ओमायक्राॅनसोबत चिकुनगुनियाचेही रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 15:55 IST

डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणाकडे दुर्लक्ष केले, तर आजाराचा ‘डंख’

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना, ओमायक्राॅनमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या नव्या संकटाचा मुकाबला करताना डेंग्यू, चिकुनगुनियासह इतर आजारांचे आव्हानही आरोग्य यंत्रणेसमोर कायम आहे. जिल्ह्यात सध्या चिकुनगुनियाचे रुग्ण आढळणे सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. मोठ्या व्यक्तींबरोबर लहान मुलांनाही डेंग्यूचा विळखा पडला. डेंग्यूच्या एकूण रुग्णांमध्ये ३० टक्के बालरुग्णांचा समावेश राहिला. त्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली; परंतु रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद झालेले नाही. चिकुनगुनियाचेही रुग्ण सापडत आहे. जानेवारीत आतापर्यंत शहरात चिकुनगुनियाचे ३ रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली. डेंग्यू, चिकुनगुनियाच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण नसल्याचीच परिस्थिती आहे. गतवर्षी केवळ एक रुग्ण आढळला. मात्र, डेंग्यू आणि चिकुनगुनियावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अजूनही कायम आहे.

घ्यावयाची काळजी...- डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे, ही काही लक्षणे आहेत.- चिकुनगुनिया हा आजार डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. या रोगाची लक्षणेही अनेकदा डेंग्यूसारखीच असतात. कोणतीही लक्षणे असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.- घराच्या परिसरात कुठेही पाणी साचू देता कामा नये. पाण्याच्या टाक्यांना झाकण लावलेले असावे. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.

तुरळक रुग्णडेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण हे वर्षभर तुरळक प्रमाणात आढळत असतात. पावसाळ्यात रुग्णसंख्या ही काही प्रमाणात वाढते. सध्याही तुरळक रुग्ण आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी

जिल्ह्यातील रुग्णांची स्थितीमहिना-डेंग्यू-चिकुनगुनियासप्टेंबर २०२१ -८०-४ऑक्टोबर २०२१-२-०नोव्हेंबर २०२१-४-०डिसेंबर २०२१-४-२जानेवारी २०२२-०-३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य