शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्याचे बारामती करू : अजित पवार

By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST

निलंगा/उदगीर : लोकसभेच्या निवडणुकीत शिवरायांचे नावही न घेणाऱ्या मोदींना आत्ताच कसे छत्रपत्री शिवाजी महाराज आठवले, असा सवाल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

निलंगा/उदगीर : लोकसभेच्या निवडणुकीत शिवरायांचे नावही न घेणाऱ्या मोदींना आत्ताच कसे छत्रपत्री शिवाजी महाराज आठवले, असा सवाल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजपा दुतोंडी भूमिका घेत असल्याची टीका केली़ राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यास निलंग्याचा बारामतीसारखा विकास करण्याचे आश्वासन दिले़ राकाँचे निलंगा मतदारसंघातील उमेदवार बसवराज पाटील नागराळकर तर उदगीर मतदारसंघातील संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची निलंगा व उदगीर येथे सभा झाल्या़ यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन राष्ट्रवादी काँग्रेस सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा, लिंगायत, मुस्लिम आरक्षणाविषयी आपणच पुढाकार घेतल्याचा दावाही पवारांनी केला़ १०० दिवसांत काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने १५० दिवस झाले तरी तांबडी कवडीही आणली नसल्याचे सांगत शेतमालाला कमी भाव देणारे धोरण स्विकारुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केल्याची टीकाही पवारांनी केली़ एकिकडे गडकरी, फडणवीस महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करीत असताना मोदी मात्र तुकडे पडणार नसल्याचे सांगत आहेत़ आता जनतेने ऐकायचे कुणाचे, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला़ निलंग्याच्या सभेत उमेदवार बसवराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, डी़एऩ शेळके, संजय बनसोडे, रामराव राठोड, चंदन पाटील, शिवाजी मुळे, मधुकर एकुर्केकर, गोपाळकृष्ण घोडके, प्रवीण भोळे, भरत चामले, सूर्यशीला मोरे, निर्मला वाडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़