शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

दुधासाठी प्लास्टिक व गंजणार्‍या भांड्यावर बंदी

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

औरंगाबाद : दूध, दही, लस्सी तथा दुधापासून तयार केलेले पदार्थ गंजणार्‍या भांड्यांमध्ये तसेच धोकादायक प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवू नयेत.

औरंगाबाद : दूध, दही, लस्सी तथा दुधापासून तयार केलेले पदार्थ गंजणार्‍या भांड्यांमध्ये तसेच धोकादायक प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवू नयेत. त्यासाठी गुणवत्तापूर्वक पात्र्याचाच वापर करावा; अन्यथा अन्न, औषधी विभाग कडक कारवाई करणार असल्याची माहिती अन्न, औषधी विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद शहरातील काही दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांना बोलावून सविस्तर सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यातील रसायन व आॅईलचे रिकामे प्लास्टिकचे ड्रम दूध व दही साठविण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती अन्न, औषधी विभागाला मिळाली असल्याने खबरदारीची उपायोजना म्हणून व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. मात्र, सूचनांचे पालन न करता जनतेच्या आरोग्याशी खेळ करणार्‍यांवर अन्न, औषधी प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. दूध व दही प्लास्टिक व जंग लागू शकणार्‍या पात्रात साठवून ठेवल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दूध, दही हे विशिष्ट प्रकारे पॅकिंग केलेले असावे. ते उघडे आणि धोकादायकपणे वाहून नेता येणार नाही, असेही सुचविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास गुन्ह्याचे स्वरूप पाहून २ ते १० लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. सुरक्षितता न बाळगता सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळणार्‍यांविरुद्ध खटला चालविला जाणार आहे. अशा प्रकारे आरोग्यास घातक असणार्‍या पात्रामध्ये राजरोसपणे दूध, दही साठवून त्याची विक्री करणार्‍यांचा शोध घेण्यासाठी अन्न, औषधी प्रशासन विभागाचे पथक कामाला लागले आहे. नागरिकांनीही अशा पात्रांमधून विक्री केले जाणारे पदार्थ खरेदी करू नयेत, असे आवाहन साळुंके यांनी केले. 1 दुग्धजन्य पदार्थ अस्वच्छ व उघड्या वाहनातून वाहून नेऊ नयेत. उघडे पदार्थ नागरिकांनी विकत घेऊ नयेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांवर अन्न औषधी विभागाचे पथक कडक कारवाई करणार आहे. 2 व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन प्लास्टिक व गंज लागणारे भांडे वापरू नये, अशा सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास २ ते १० लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई. 3 दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी स्टील, काच, चिनीमातीच्या भांड्याचा वापर हवा. कॅरीबॅग वापरणार्‍यावरही कारवाई.