रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:42 IST2026-03-21T19:42:16+5:302026-03-21T19:42:49+5:30

स्ट्राँग रूममध्ये निघाले बनावट सोने; ऑडिटमध्ये फुटले फसवणुकीचे भांडं, मॅनेजरवर गुन्हा

Bajaj Finance Gold Loan Scam in Waluj: Branch Manager Fraudulently Sanctions ₹11.90 Lakh on Fake Gold | रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना

रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना

वाळूज महानगर : वाळूज येथील बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शाखा व्यवस्थापकाने बनावट सोने तारण ठेवून बनावट ग्राहकाच्या नावाने तब्बल ११.९० लाखांचे कर्ज मंजूर केले. कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे वित्तीय संस्थांमधील अंतर्गत नियंत्रण व पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कन्हैयालाल किशोरलाल अहिर (वय ३५, एरिया मॅनेजर) यांच्या फिर्यादीनुसार, ते कंपनीत ऑडिट व शाखा निरीक्षणाचे काम पाहतात. दि. २ जानेवारी रोजी रिजनल मॅनेजर महेश वीर यांनी बजाजनगर शाखेतील समस्या लक्षात घेऊन तातडीने भेट देण्याच्या सूचना दिल्या. यानुसार अहिर हे त्याच दिवशी सायंकाळी शाखेत पोहोचले असता, शाखा व्यवस्थापक सदाशिव मुरलीधर डोईफोडे हे चार ते पाच दिवसांपासून अनुपस्थित असल्याचे आणि त्यांचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ऑडिटर सुनील भालेराव यांनी शाखेचे ऑडिट सुरू केले. ऑडिटदरम्यान ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने स्ट्राँग रूममधून काढून तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका गोल्ड पाउचबाबत संशय निर्माण झाला. पुढील पडताळणीत त्या पाउचमध्ये बनावट सोने असल्याचे स्पष्ट झाले. तसेच वजनातही फेरफार आढळून आला.

रक्षकच निघाला चोर, तपास सुरू
तपासात पुढे असे उघड झाले की, सदाशिव डोईफोडे यांनी दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी एका व्यक्तीकडून हे सोने स्वीकारले होते. त्यांनी स्वतःच त्याची पडताळणी करून ते खरे असल्याचे दाखवले आणि सहकारी कर्मचारी निकिता जैस्वाल यांची सही घेऊन ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले. यानंतर आरोपीने राजकुमार खंदारे या नावाने बनावट ग्राहक तयार करून त्या बनावट सोन्यावर गोल्ड लोन मंजूर केले. या प्रक्रियेतून एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज काढून कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सदाशिव मुरलीधर डोईफोडे (रा. संभाजी कॉलनी) व राजकुमार प्रकाश खंदारे (रा. गारखेडा परिसर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title : रक्षक ही निकला चोर: नकली सोने पर लोन, मैनेजर ने कंपनी को लगाया चूना

Web Summary : वालुज में बजाज फाइनेंस के एक मैनेजर ने नकली सोने और काल्पनिक ग्राहक के नाम पर ₹11.90 लाख के धोखाधड़ी वाले गोल्ड लोन मंजूर किए। आंतरिक ऑडिट में घोटाला सामने आने के बाद पुलिस जांच कर रही है। दो संदिग्धों के नाम सामने आए हैं।

Web Title : Guardian Turns Thief: Manager Scams Company with Fake Gold Loan

Web Summary : A Bajaj Finance manager in Waluj approved ₹11.90 lakh in fraudulent gold loans using fake gold and a fictitious customer. An internal audit revealed the scam, leading to a police investigation. Two suspects have been named.